Diwali Faral : चकली चारशे, करंजी पाचशे तर डिंक आणि मेथी लाडू सातशे रुपये किलो, नाशिकमध्ये दिवाळी फराळ महागला!
Diwali Faral : नाशिकमध्ये (Nashik) दिवाळी (Diwali) सणात गृहिणींना फराळाची चव चाखण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
Diwali Faral : दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर कपडे, दागिने, मिठाई तसेच विविध खाद्य पदार्थांची मोठी खरेदी केली जाते. ग्राहकांकडून सर्वाधिक खरेदी केली जाते ती फराळाची (Faral) यंदा मोठ्या जल्लोषात दिवाळीचा सण साजरा होणार असल्याने दिवाळी सणात फराळाला मोठी मागणी असते. मात्र यंदा या फराळाची चव चाखण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
कोरोनाचे (Corona) मळभ दूर झाल्यानंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करता येणार आहे. अवघ्या आठ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने बाजारपेठ सजल्या असून गृहिणींची लगबग सुरु झाली असून फराळासाठी देखील बाजारपेठ सजली आहे. मात्र यंदा महागाईचे दर वाढल्याने आपसूक फराळ देखील महागला आहे. घरगुती सिलेंडर गॅसचे (Gas Cylinder) वाढलेले दर तसेच फराळ बनवण्याची लागणारी तर वस्तूंचे दर देखील चढे असल्याने फराळाच्या दारात सुमारे 20 ते 30 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नाशिकमध्ये असंख्य मिठाईवाले असून अनेक जण घरगुती मिठाई बनवण्याला प्राधान्य देतात. मात्र यंदा फराळ बनविण्याच्या वस्तूंचे दर वाढल्याने खिशाला कात्री लागणार आहे.
कोरोनाचे दोन वर्ष निर्बंधात गेल्याने यंदा मात्र निर्बंध मुक्त दिवाळी साजरी करता येणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यपदार्थांनी बाजारपेठ सजायला सुरुवात झाली असून फराळ देखील उपलब्ध झाले आहेत, मात्र वाढत्या महागाईचा फटका नागरिकांसह गृहिणींना बसणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीच्या सणावरही महागाईचे सावट असून, रेडिमेड फराळही त्यातून सुटलेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत पदार्थांच्या दरात पाच ते आठ टक्क्यांची वाढ दरामध्ये झाली आहे. तेल, डाळी, तूप, साखर अशा सर्व जिन्नसांच्या किंमती वाढल्यामुळे फराळाच्या दरांमध्ये वाढ करावी लागणार असल्याचे फराळ तयार करणाऱ्यांकडून सांगण्यात येते. फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे तेल चण्याची डाळ आणि इतर पदार्थांच्या दरात होणारे वाऱ्यांवर बदल त्यामुळे यंदा देखील बहुतांश फराळांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे
रेडिमेड फराळाला मागणी
दसरा झाला की रेडिमेड फराळ तयार करणारे महिलांचे बचतगट, संस्था तसेच घरगुती लघुउद्योजकांकडून हा फराळ तयार करण्यासाठी लगबग सुरू होते. या फराळाला महागाईचा चांगलाच चटका बसला आहे. महागाईमुळे विविध जिन्नसांच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनीही ही परिस्थिती लक्षात घेऊन दरात सवलतीची अपेक्षा करू नये, असे फराळविक्रेत्यांचे म्हणणे आहे. नाशिकमध्ये अनेक जुने खव्वय्ये असून ते घरगुती पद्धतीने फराळ बविण्याला प्राधान्य देतात. यामध्ये चकली, चिवडा, राव लाडू, शंकरपाळे आदी मिठाईचे पदार्थ बनविले जातात. याच रेडिमेड मिठाईला नाशिककर पसंती देत असून रेडिमेड मिठाईला मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.
असे आहेत फराळाचे दर
यंदा स्पेशल भाजणी चकली चारशे ते पाचशे रुपये किलो, रवा, रवा नारळ, रवा बेसन, बेसन लाडू सुमारे तीनशे ते सहाशे रुपये किलो आहेत. चिवडा अडीचशे ते चारशे रुपये आहे. शंकरपाळे 350 ते 450 रुपये, साधी शेव 250 रुपये तर लसूण शेवही 300 रुपये किलो असा दर आहे. सुक्या खोबऱ्याच्या सारणाची करंजी पाचशे रुपये किलो तर अनारसे देखील पाचशे रुपये किलोपर्यंत आहे. तर डिंक आणि मेथी लाडू सातशे रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यात वाढ झाली आहे.