Nashik Crime : स्वतःच्या बायकोनेच केलं फेसबुक अकाउंट हॅक, तरुणींना केले अश्लील मॅसेज, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
Nashik Crime : नाशिकमधील (Nashik) फेसबुक (Facebook) युजरला तरुणीने धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या संशयितांमध्ये पीडित तरुणाची बायको असल्याचे समोर आले आहे.
Nashik Crime : मागील काही वर्षांपासून फेसबुक, (Facebook) व्हाटसप (Whatsapp) वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र हे प्रमाण वाढले असताना दुसरीकडे सायबर गुन्ह्यांमध्येही (Cyber Crime) वाढ झाल्याचे चित्र आहे. फेसबुक अकाउंट हॅक करुन त्या अकाउंटचा अॅक्सेस हॅकर स्वत:कडे घेतात. युझरला त्याचा अॅक्सेस परत देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. असाच एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.
इंटरनेटमुळे जग जवळ आल्याने समाज माध्यमांवर तरुणाई प्रचंड सक्रिय आहे. त्यामुळे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कुणाशीही संवाद साधणं अगदी सोपं झालं आहे. मात्र अस असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रमाण वाढलं आहे. नाशिकमधील एका तरुणाला याचा प्रत्यय आला आहे. फेसबुकवर अकाऊंट असणाऱ्या एका युवकाला तरुणीने धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या तिघा संशयितांमध्ये पीडित तरुणाची बायको असल्याचे समोर आले आहे.
सिडको येथील पीडित युवकाचे याच फेसबुकवर अकाउंट आहे. काही दिवसांपूर्वी संशयितांनी पीडित युवकाच्या फेसबुक प्रोफाइल हॅक करून डेटा चोरण्यात आला. त्याचबरोबर हा डेटा पीडित युवकाच्या मित्र नातेवाईकांना फेसबुक, व्हाटसपद्वारे पाठविण्यात आला. तसेच सदरील फेसबुक अकाउंट वरून इतर मित्र व नातेवाईकांना धमकी व शिवीगाळ करण्यात आली. तसेच अनोळखी मुलींना अश्लील मॅसेज करण्यात येऊन बदनामी रोखायची असेल तर ४५ लाख रुपये दे, अशी मागणी संशयितांनी पीडित तरुणाकडे केली.
तसेच हे पैसे न दिल्यास पर्सनल मॅसेज ऑफिस मध्ये शेअर करण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित तरुणाने अंबड पोलीस ठाण्यात जाऊन दाखल केली आहे. या प्रकरणात तिघा संशयितांनी पीडित तरुणाचे फेसबुक अकाऊंट हॅक करून पीडित युवकाची बदनामी केली. त्यानुसार पीडित तरुणा च्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
...अशी घ्यावी काळजी
फेसबुक अकाउंटचा पासवर्ड हा मोबाईल नंबर, नाव व जन्मतारीख असा ठेवू नये. तसेच पासवर्ड वेळोवेळी बदलावा. फेसबुक वापरकर्त्यांनी आपल्या फेसबुकचे सेटिंग चेंज करून प्रोफाइल लॉकिंग ही सेटिंग ठेवावी. आपले फोटो, पोस्ट, कमेंट बाबत प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन ओन्ली फ्रेंड्स सेटिंग करून घ्यावी. जेणेकरून वैयक्तिक फोटो सार्वजनिक होणार नाहीत.