एक्स्प्लोर

Nashik Blast : नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या रूममध्ये सिलेंडरचा भडका, स्फोटात स्लॅबही कोसळला!     

Nashik Blast : रूममधील विद्यार्थी जागी असल्याने तत्काळ ते घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

Nashik Blast : नाशिक (Nashik) येथील कॅनडा कॉर्नरजवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास आगीचा भडका उडाला. क्षणार्धात संपूर्ण फ्लॅट आगेच्या भक्षस्थानी सापडला. सुदैवाने रूममधील विद्यार्थी जागी असल्याने तत्काळ ते घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) होऊन स्लॅब कोसळल्याने फायरमन विजय नागपूरे हे जखमी झाले. 

नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नरजवळील बिजनेस स्क्वेअर जवळील मिताश्री अपार्टमेंटच्या (Apartment) तिसऱ्या मजल्यावर सदनिकेत आगीची घटना घडी. शरणपूर परिसरातील तिबेटियन मार्केट जवळील अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटमधून अचानकपणे धुराचे लोट व आगीच्या ज्वाला भडकतांना नागरिकांच्या निदर्शनास आल्या. त्यांनी तात्काळ अपार्टमेंट मध्ये रहिवाशांना आगीची माहिती दिली. त्याचबरोबर आग लागलेल्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तात्काळ जिन्यावरून खाली पळ काढला. यातील स्वप्निल लहामगे यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या दिल्यानंतर शिंगाडा तलाव येथील मुख्यालयास दिली. माहिती मिळताच फायरमन पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आगीचे स्वरूप बघून तातडीने अतिरिक्त मदत मागविण्यात आली. मुख्यालय, सिडको, पंचवटी, कोणार्क नगर येथून प्रत्येकी एक असे पाच बंब घटनास्थळी पोहोचले. 

दरम्यान दोन बंबांचा वापर करता जवानांना यश आले. सुमारे दोन तास शर्तीचे प्रयत्न करत आग विझवण्यात आली. दरम्यान घरमालक निलेश आंबेकर यांच्या तेरावे क्रमांकाच्या सदनिकेत आठ ते दहा विद्यार्थी वास्तव्यास असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान जवानांनी स्वयंपाक गृहातून दोन सिलेंडर बाहेर काढले. ते अर्धवट भरलेले होते. घरात साचलेला धूर अंधारामुळे एक सिलेंडर दिसून आला नाही. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा सिलेंडर घरात आहे. पण रिकामी असल्याचे सांगितले. यामुळे जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्यावर लक्ष केंद्रित केले. यावेळी अचानकपणे एक सिलेंडर तापल्याने फुटला. यावेळेस स्लॅबचा काही भाग कोसळून आगमिषांना दलाचे कर्मचारी नागपूरे हे जखमी झाले. सुदैवाने त्यांच्या डोक्यावर हेल्मेट परिधान केलेले असल्यामुळे ते मध्यम स्वरूपात जखमी झाले. सद्यस्थितीत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्य दरवाजा उघडताच आगीचे लोट बाहेर पडण्यास सुरवात झाली. यावेळी अग्निशमन दलाने माईकवरून सूचना देत संपूर्ण अपार्टमेंट रिकामी करण्यास सांगितले. यामुळे तातडीने सर्व रहिवासी सुरक्षितपणे  आपापल्या घरांमधून बाहेर पडले. जवानांनी  शर्तीचे प्रयत्न करत भीषण आग शमवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला. सुमारे दोन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचे समजते आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget