Nashik News : नाशिक शहरासह जिल्ह्यात गारठा वाढला, बाहेर निघणेही झाले मुश्किल!
Nashik News : नाशिक शहरासह जिल्ह्यात गारठा वाढला असून ढगाळ वातावरणाने सूर्यनारायणाचेही दर्शन उशिराने होत आहे.
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) तापमानाचा पारा जरी वाढला असला तरी मात्र सकाळपासून बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात गारठा वाढला असून ढगाळ वातावरणाने नाशिक शहरासह जिल्ह्याची सुरवात होत आहे. तर सूर्यनारायणाचेही (Sunrise) दर्शन उशिराने होत असल्याची परिस्थिती आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडक वाढला असून दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने (Climate Change) वेढा घातला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही घसरण झाली असून शीतलहरींमुळे दिवसाही नागरिकांना गारव्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत घरातून बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. बाहेर पडताना संपूर्ण शरीर झाकून लोक घराबाहेर पडत आहेत. दिवसभर स्वेटर आणि रात्री शेकोटीचा आधार नागरिक घेत आहेत.
दरम्यान थंडीची सुरुवात झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात बोचरा थंडीचा अनुभव नाशिककरांनी घेतला मात्र गेल्या दोन दिवसांपासून नाशिककरांना हुडहुडी भरली आहे सलग दोन दिवस सकाळी किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे त्यामुळे सकाळी थंडीचा कडाका जाणवत असला तरी दिवसाही शीतलहरींमुळे वातावरणात गारवा जाणवतो आहे उत्तर भारतात झालेल्या बुधवारपासून ढगाळ वातावरण झाल्याने सूर्यनारायणाचे दर्शनही उशिराने होत आहे.
दोन दिवसांपूर्वी पर्यंत नाशिक मधील सरासरी तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले होते 3 जानेवारीला कमाल तापमान 30.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असताना बुधवारी त्यात सहा अंशांची घसरण झाली त्यामुळे हे तापमान 24.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले गुरुवारी देखील कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले तर दिवसभर वाऱ्याचा वेगळी आठ किलोमीटर प्रति तास होता. गुरुवारी नाशिक मधील किमान तापमान 13.2 अंश तर कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर आज शुक्रवारी हेच तापमान 16. 2 अंशावर आले आहे आहे. हवेत गारवा असल्याने प्रचंड थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे.
सर्दी, खोकला वाढला...
गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण असल्याने शिवाय दिवसादेखील हवेत प्रचंड गारवा जाणवत आहे. यामुळे शहरात सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे क्लिनिकला गर्दी वाढत असून बदलामुळे व्हायरल फिवर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ढगाळ वातावरणामुळे आतांनी तापमानात घसरण होत असल्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. यासाठी घराबाहेर पडताना उबदार कपडे, पाणी पिताना कोमट पाण्याचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा असे आवाहन डॉक्टरांकडून देण्यात येत आहेत.