Chitra Wagh : ज्या दिवशी ही बाई सापडेल, त्या दिवशी तिचं थोबाड रंगवेल, चित्रा वाघ यांचा उर्फी जावेदला इशारा
Chitra Wagh : उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.
Nashik Chitra Wagh : अशा प्रकारचे वक्तव्य करून समाज गढूळ करण्याचे काम होत आहे. याला मुद्दाम करणं, असं म्हणतात, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केली आहे. त्याचबरोबर अभिनेत्री उर्फी जावेदवर (Urfi Javed) प्रचंड संताप व्यक्त करत उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाहीत, ही बाई मला ज्या दिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेल असा थेट इशारा त्यांनी उर्फी जावेदला दिला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले होते. वक्तव्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली असून नाशिकमध्ये (Nashik) आज भाजप आणि शिंदे गटाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ या नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अजित पवार यांच्यावर आगपाखड केली. त्याचबरोबर अभिनेत्री उर्फी जावेदवर प्रचंड संताप व्यक्त करत उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही, ही बाई मला ज्या दिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेल असा थेट इशारा त्यांनी उर्फी जावेदला दिला आहे. दरम्यान अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना जाणून-बुजून धर्मवीर म्हणण्यात येते, ते धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक आहेत इतिहासाची काही दाखले देत त्यांनी हे वक्तव्य केले होते. मात्र या विधानावर आता भाजप आणि शिंदे गटाला आक्षेप असून या दोन्ही पक्षांकडून अजित पवार यांच्या विरोधात राज्यभर राज्यभर आंदोलन छेडण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात देखील शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून शहरातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. भाजपच्या आंदोलनाच्या वेळी महिला मोर्चाच्या चित्रा वाघ यादेखील उपस्थित होत्या.
यावेळी चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात भाजपने नाशिकमध्ये आंदोलन करत अजित पवार यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. चित्रा वाघ यांनी अजित पवार यांच्या या विधाराहून विधानावरून टीका केली असून त्या म्हणाल्या, छत्रपती संभाजी राजे यांनी धर्मासाठी खूप काही भोगल आहे, ते धर्मवीर नाही असे अजित पवार यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्यांनी बोलणं हे दुर्दैव आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. या वादामुळे पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामकारणाचा मुद्दा उपस्थित झाला असून यावर बोलताना त्या म्हणाल्या, औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असं होईलच, मात्र आता मागणी आहे की औरंगाबादचं नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करा अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.
हेही वाचा:
उर्फी जावेदवर संतापल्या...
दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्या सध्या शाब्दिक चकमक सुरू असून यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदला खडसावले आहे. आम्ही काय काम करतो, हे उर्फी सारख्या बाईला मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्या पद्धतीने नंगानात सुरू आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दात चित्र वाघ यांनी उर्फी जावेदला सुनावले आहे. संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या लोकांना हा नंगाना दिसत नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मला तर ही उर्फट बाई कोण आहे? हे माहीतच नाही एका बाईने मला हे व्हिडिओ पाठवले. तिने मला सांगितलं, मुंबईच्या रस्त्यावर काय चाललय बघा हा नंगानाच आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही पोलिसात तक्रार केली. याला अंतिम स्वरूप दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा इशारा देखील यावेळी चित्रा वाघ यांनी दिला आहे. ज्या दिवशी ही बाई मला सापडेल, त्या दिवशी मी तिचे थोबाड रंगवेन आणि नंतर तुम्हाला ट्वीट करून सांगेन असे चित्रा वाघ यावेळी स्पष्ट म्हटले आहे.