(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde : सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde : सरस्वतीचे (Sarasvati) फोटो काढले जाणार नाही, जे लोकांना वाटते, तेच आम्ही करणार अशी खरमरीत प्रतिक्रया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे.
CM Eknath Shinde : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल नवा वाद निर्माण झाला असून यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही. जे लोकांना वाटते, तेच आम्ही करणार अशी खरमरीत प्रतिक्रया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील भुजबळांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये (Nashik) एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी मुंबई (Mumbai) येथील एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या (Saraswati) फोटो संदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी या वक्तव्यांवर टीका करत भुजबळांचे कां टोचले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहे. या कार्यक्रमप्रसंगी भुजबळ यांनी वरील वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना म्हणाले कि, सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही असेही ते म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात भुजबळ म्हणाले होते कि, 'अंधश्रद्धा आणि आमच्या महिला-भगिनींबाबत काही विचारायला नको किंवा काही सांगायला नको. शाळांमध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा फोटो लावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावा. पण, सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो? असा प्रश्न भुजबळ यांनी केला. यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय आहे भुजबळांचे आक्षेपार्ह वक्तव्य ?
'शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. त्यांची पूजा कशासाठी करायची?, असे वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. महापुरुषांमुळे तुम्हा आम्हाला शिक्षण मिळाल, सगळं मिळालं यांची पूजा करायला हवी..यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे', असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं.
भुजबळांच्या फार्महाऊसवर बंदोबस्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता छगन भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर भुजबळांनी केलेल्या या विधानावरून वातावरण तापल्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नाशिक पोलिसांकडून खबरदारी देखील घेतली जात आहे. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत.