एक्स्प्लोर

Nashik Chhagan Bhujbal : 'निवडणुकीत देवाला मध्ये आणलं, तरी शेवटी पराभव झाला', छगन भुजबळांचा खोचक टोला 

Nashik Chhagan Bhujbal : कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंगबलीचा वापर झाला. मात्र शेवटी पराभव झाल्याचे दिसून आले.

Nashik Chhagan Bhujbal : 'ज्या अर्थी दंगली ना सुरुवात झाली, त्याअर्थी निवडणूक जवळ आली. जिथे जिथे निवडणूक आली, तिथे हिंदू मतांना आकर्षित केले जात आहे. कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंग बलीचा वापर झाला. शेवटी काय तर पराभव झालेला दिसून आला. निवडणुकीमध्ये देवाला टाकले तरी पराभव झाला. त्यामुळे धार्मिक मुद्यावर निवडणूक जिंकल्या जाणार नाही, असा सूचक सल्ला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे. 

आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाशिकमध्ये (Nashik) होते. एकीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आज ईडीने (ED) चौकशीसाठी बोलवल्याने राज्यात आंदोलने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Protest) वतीने आंदोलन करण्यात आले. तर छगन भुजबळ यांनी देखील ईडी प्रकरणासह इतर अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यावरुन राजकीय वातावरण सुद्धा तापल्याचे दिसून आले होते. तसेच कर्नाटक निवडणूक निकालानंतर अनेक भागातील प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून आले. यावर छगन भुजबळ सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. 

छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, "ज्या अर्थी दंगलीना सुरुवात झाली, त्याअर्थी निवडणूक जवळ आली. जिथे जिथे निवडणूक आली, तिथे हिंदू मतांना आकर्षित केले जात आहे. कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंग बलीचा वापर झाला. शेवटी काय तर पराभव झालेला दिसून आला. एवढा प्रचंड पराभव होईल, अस वाटले नव्हते. आता देशाला कळाले, बजरंग बलीचे नाव घ्या आणि मतदान करा. पण त्याने काही होत नाही. निवडणुकीमध्ये देवाला टाकले तरी पराभव झाला. त्यामुळे धार्मिक मुद्यावर निवडणूक जिंकल्या जाणार नाही," असा सूचक सल्ला छगन भुजबळ यांनी दिला आहे. "भाजपाकडे लॉंड्री आहे, त्यांच्यांकडं जे येतात ते स्वच्छ करतात. यंत्रणांवर दबाव टाकण्याचा हेतु नाही. आमच्या प्रांताध्यक्षावर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसयाचे का?" असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला. 

राष्ट्रवादीकडून आंदोलन 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशी होणार असल्याने या कारवाई विरोधात युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आणि जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आली. यावेळी भाजपा हमसे डरती है! ... ईडी को आगे करती है..., पन्नास खोके.. ईडी पण ओके.. अशी घोषणाबाजी करण्यात येत होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget