Nashik Bogus Certificate : नाशिक बोगस प्रमाणपत्र प्रकरणी 21 पोलिसांवर गुन्हा दाखल, सिव्हीलचे डॉक्टर्स फरार
Nashik Bogus Certificate : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र (Bogus Certificate) घेणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातील (Rural Police) 21 पोलीस कर्मचाऱ्यांवरच गुन्हा दाखल झालेला आहे.
Nashik Bogus Certificate : नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयातून आंतरजिल्हा बदलीसाठी (Transfer) बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र घेणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातील (Rural Police) 21 पोलीस कर्मचाऱ्यांवरच पोलीस दलाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच ज्या रुग्णालयात ऑपरेशन करण्यात आले, त्या ठिकाणातील लोक या रॅकेट मध्ये सहभागी असल्याचे शक्यता नाकारता येत नाही, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) दिली आहे.
ग्रामीण पोलीस दलातील 21 पोलीस कर्मचाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी कुटुंबीयांना गंभीर आजाराची कारणे दाखवली. या आजारासाठी जे वैद्यकीय प्रमाणपत्र बनवण्यात आले ते बनावट असल्याचा तपासात निष्पन्न झालेले असून या प्रमाणपत्रावर दोन उच्च पदस्थ डॉक्टरांच्या सह्या आहेत. त्यानुसार तपासी पथकाला दिलेल्या अहवालानुसार सुरुवातीला दाखल सहा जणांना विरोधात गुन्हा दखल केल्यानंतर आता आणखीन या 21 कर्मचाऱ्यांची वाढ झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आणखी नावे पुढे येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी वर्तविली आहे.
दरम्यान बोगस प्रमाणपत्र प्रकरणी तालुका पोलीस निरीक्षक सारिका बाजीराव यांच्या पथक कसून चौकशी करीत आहे. सुरवातीला पथकाच्या तपासात पोलीस दलाचा लिपिक हीरा मनोज, लिफ्ट मॅन कांतीलाल गांगुर्डे यांच्यासह जिल्हा सिव्हील रुग्णालयातील उच्च पदस्थ डॉक्टर्स तसेच दोन खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची नावे ही या तपासात निष्पन्न झाल्याचे समोर आले. जिल्हा रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरांनी न्यायालयात जामीन अर्ज केला होता. नायायालयाने दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्या मागावर पोलिसांची पथक रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारावर दस्तावेज तयार करण्यात आले असून पोलीस पथक चौकशी करत आहे.
त्यानुसार तपासी पथकाला दिलेल्या अहवालानुसार सुरुवातीला दाखल सहा जणांना विरोधात गुन्हा दखल केल्यानंतर आता या प्रकरणी 21 पोलीस कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयात डॉक्टर्स आणि ज्या ठिकाणी पोलीस नातेवाईकांची तपासणी झाली, अशा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी आणखी नावे पुढे येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी वर्तविली आहे.
जामीन अर्ज फेटाळला
आंतर जिल्हा बदलीसाठी लागणारे प्रमाणपत्र बनावट पद्धतीने बनवून दिल्याने संशयितांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. दरम्यान रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या दोन्ही डॉक्टर्सनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. दोन्ही डॉक्टरांचा अटकपूर्वक जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या दोघांनाही अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांच्या अटक करण्याच्या कारवाईकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.