एक्स्प्लोर

Nashik News : नाशिक पदवीधरसाठी भाजपला तुल्यबळ उमेदवार सापडेना, कोण आहेत इच्छुक उमेदवार 

Nashik News : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस विरोधात भाजपला तुल्यबळ उमेदवार सापडत नाहीये.

Nashik News : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) सुधीर तांबेच्या विरोधात भाजपला (BJP) अद्यापही तुल्यबळ उमेदवार सापडत नाहीये. राज्यात सत्ता असताना देखील भाजपला उमेदवाराची शोधा शोध करावी लागत असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याआधीच विधानपरिषदेची निवडणूक चर्चेत आली आहे. 

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या (Nashik Padvidhar) निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख एक दिवसावर आली आहे. तरीही एकाही प्रमुख पक्षाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला नसल्याने तर्क वितर्क आणि चर्चाना उधाण आले, विजयाची हट्ट्रिक करणारे काँग्रेसचे सुधीर तांबेही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवसाचा मुहूर्त का साधत आहेत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून  आपल्या नावाची आधीच घोषणा झाली असून गुरुवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सुधीर तांबे यांच्या गोटातून संगितले जात आहे.. तर आपल्या भाजपककडून उमेदवारी लढविण्याचा अफवा कोणीतरी पसरवत आहेत.. माझे इतर पक्षातील; नेत्याशी चांगले सबंध आहेत. त्याचे गैर अर्थ काढू नका असं आवाहन सुधीर तांबे यांचे पुत्र  युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे.

सुधीर तांबे शड्डू ठोकून मैदानात उतरले असले तरीही समोर तुल्यबळ उमेदवार भाजपला सापडत नाहीये.  मागील पंचवार्षिकला राज्यात भाजपचेच सत्ता होती. तरीही तांबेंनी भाजपच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली होती. याहीवेळी भाजपाचीच राज्यात सत्ता आहे. तरीही उमेदवाराचे नाव घोषित होत नाहीय. त्यामुळेच वेगवगेळ्या नावाची चर्चा सुरु झालीय.. यात सर्वात आघाडीवर नाव आहे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांचे.. विखेंना उमेदवारी दिली तर नगर जिल्ह्यातील विखे थोरात कुटुंबातील राजकीय सामना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही बघायला मिळणार आहे. विखे सोबतच नगर जिल्ह्यातील धनंजय जाधव, धुळे जिल्ह्यातील धनराज विसपुते यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. 

धनंजय जाधव यांनी तर प्रदेशाध्यक्ष सकारात्मक असून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. धनंजय जाधव हे आधी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक होते, मात्र सध्या ते भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तर दुसरीकडे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी तीन नावं आहेत. मात्र अजूनही वेगळे नाव येऊ शकते असे म्हणत सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यानं सत्ताधारी पक्षाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. तर दुसरीकडे उमेदवारच नसल्यानं कोणता उमेदवार रिंगणात याची उत्सुकता तांबे समर्थकांना आहे.. त्यामुळे अवघ्या काही तासातच उमेदवाराची घोषणा होऊन निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे..

कोण आहेत धनंजय जाधव
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून धनंजय कृष्णा जाधव हे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांचे शिक्षण एलएलबी झाले आहे.  धनंजय जाधव हे 2008 साली वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक झाले होते. त्यानंतर 2014 -15 साली धनंजय जाधव हे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. धनंजय जाधव यांचे वडील कृष्णा जाधव आठ वेळा नगरसेवक राहिले आहेत. सध्या धनंजय जाधव यांच्या पत्नी सुप्रिया जाधव सध्या महापालिकेच्या प्रभाग 9 मध्ये काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. धनंजय जाधव हे आधी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक होते, मात्र सध्या ते भाजप खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

धनंजय जाधव यांच्या पाठोपाठ धुळे जिल्ह्यातील धनराज विसपुते यांनीही आपली दावेदारी सांगितली आहे.. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे निकटवर्ती अशी ओळख सांगणारे धनराज विसपुते आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन पदावर कार्यरत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सह संयोजक पदी देखील ते काम करीत आहेत....

कोण आहेत धनराज विसपुते..
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी धुळ्याचे धनराज विसपुते हे देखील इच्छुक उमेदवार आहेत. विसपुते यांचे शिक्षण एम एस्सी, जीडीसी अँड ए झाले आहे. विसपुते यांचा व्यवसाय हा शेती असून अनेक शिक्षण संस्थांवर ते विश्वस्त पदावर आहेत. विसपुते यांची राजकीय कारकीर्द पहिली असता 2017 साली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीवर त्यांची निवड झाली. धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीत आचारसंहिता प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. शासन सेवेतील इतर मागासवर्ग कर्मचारी आणि अधिकारी यांना पदोन्नती करिता जात वैधता पडताळणी आणि अट शिथिल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे निकटवर्ती म्हणून धनराज विसपुते यांची ओळख आहे. तसेच आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन या पदावर धनराज विसपुते सध्या कार्यरत असून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सहसंयोजकपदी देखील ते काम करीत आहेत. धनराज विसपुते यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती वनश्री पुरस्कार, स्वच्छता दूत पुरस्कार पनवेल महानगरपालिका, ऊर्जा व संवर्धन पुरस्कार महाराष्ट्र राज्य मेढा, रायगड गौरव पुरस्कार, शिक्षण महर्षी पुरस्कार ग्राम कन्या पुणे 2013... यासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget