Nashik Railway Station : एखाद्या कुटुंबात बाळ जन्माला आल्यानंतर बाळाचं बारसं केलं जात. अनेक कुटुंबातली सदस्य नाव सूचवत असतात. अनेकजण मित्र मैत्रिणींना विचारात असतात. एका महिलेने जिने नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर (Nashik Road Railway Station) आलेल्या रेल्वेत बाळाला जन्म (Railway Birth) दिला. यानंतर महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला. या आनंदाच्या भरातच बाळाचे नाव तिने' नाशिक' ठेवले. 


खरं तर आजपर्यंत रेल्वेच्या डब्यात अनेकदा प्रसूती झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र ही घटना त्या बाळाच्या आईसह नाशिककरांना सुखद धक्का देणारी आहे. तर झालं असं की, मुंबईहून (Mumbai) सुटणारी सेवाग्राम एक्सप्रेस नाशिककडे (Nashik) मार्गस्थ होत होती. अशातच रेल्वेच्या डब्यात यवतमाळ येथील गर्भवती महिला प्रवास करत असताना अचानक प्रसूतीकळा सुरु झाल्या. यावेळी डब्यातील महिलांनी प्रसंगवधान राखत महिलेला धिरडं येण्याचा प्रयत्न केला. अखेर नाशिकरोड रेल्वे स्थानक क्रोस केल्यानंतर या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. महिलेने विचारलं की, आता कुठलं स्टेशन गेलं, तर सर्वानी सांगितलं नाशिक रोड म्हणून, म्हणून त्या महिलेने आपल्या बाळाचे नाव देखील 'नाशिक' ठेवले. 


मुंबईहून नेहमीप्रमाणे सेवाग्राम एक्सप्रेस (Sevagram Exapress) निघाली होती. या रेल्वेतील एका डब्यात यवतमाळ (Yavatmal) येथील गर्भवती महिला प्रवास करत होती. मात्र नाशिकरोड रेल्वे स्टेशन जसं जसं जवळ येऊ लागलं, तसं तसं महिलेला प्रसूतीकळा येऊ लागल्या. महिलेसोबत असलेल्या महिलांनी प्रसंगवधान राखून महिलेला धीर दिला. सर्व महिला घोळका करून बसल्या. आणि नैसर्गिक प्रसूती होण्याची वाट पाहू लागल्या. इकडे महिलेला प्रसूतीकळा सुरू असल्याने ती जोरजोरात ओरडत होती, दुसरीकडे इतर प्रवाशांनी प्रसूती सुखरूप होण्यासाठी प्रार्थना सुरू केली. अशातच नाशिकरोड स्टेशन काही अंतर क्रॉस केल्यानंतर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी रेल्वे डब्यात एकाच जल्लोष झाला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. सर्वानी टाळ्यांच्या गजरात बाळाचे स्वागत केले. एकूणच ही संपूर्ण घटना सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये चर्चेचा विषय ठरली असून रेल्वेच्या वर्तुळातही जोरदार चर्चा होऊ लागली आहे.


जन्मही रेल्वेत अन् नामकरणही 


यवतमाळला निघालेली हि महिला नाशिकरोड रेल्वे स्टेशनदरम्यान प्रसूत झाली. यावेळी डब्यातील इतर महिलांनी मदत केली. यावेळी डब्यात आनंदाचे वातावरण होते. यावेळी प्रवाशांनी बाळाचे नाव ठेवण्याबाबत चर्चा रंगू लागली. यातील एका महिलेने बाळाच्या आईला नावाबाबत विचारलेही, त्यावर या आईने  तात्काळ प्रश्न केला. आता कोणतं स्टेशन गेलं. प्रवाशांनी उत्तर दिलं नाशिक. महिलेने लगेच सांगून टाकलं बाळाचे नाव नाशिक ठेवू. खरंतर धावत्या रेल्वेत बाळाचा जन्म, आणि बाळाचे नामकरणही झाले. रेल्वेतील संपूर्ण वातावरणच बाळाच्या जन्मानंतर बदलून गेल्याचे दिसून आले.