Nashik Dada Bhuse : पाकिस्तान, बांगलादेश (Pakistan) येथे आर्थिक चणचण आहे, म्हणून तिकडे होणारी कांद्याची निर्यात कमी होत आहे. हेही कारण कांद्याचा दर कमी होण्यामागे आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात देखील कांदा उत्पादन (Onion Issue) होत असल्याने हेही दर पडण्याचं कारण आहे. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि मुख्यमंत्री शिंदे यांना आश्वस्त केले असल्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले. 


कांदा दरावरून चांगलेच रणकंदन माजले आहे. अशातच आज पालकमंत्री दादा भुसे आज नाशिकमध्ये असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे ही वस्तुस्थिती आहे. हस्तक्षेप योजना आहे. नाफेडच्या माध्यमातून सव्वा लाख टन खरेदी टार्गेट देण्यात आले आहे. ही खरेदी प्रगती पथावर आहे. 400 रुपया पासून 800 रुपये होते. गेल्या 8 दिवसात नाफेड खरेदी सुरू झाल्यानंतर 150 ते 200 रुपये इतकी वाढ कांद्याच्या दरात सुरू आहे. कमी साईज कांदा घेतला जातं नाही अशी तक्रार आहे ते जाणून घेणार आहोत. पाकिस्तान बांगलादेश येथे आर्थिक चणचण आहे. म्हणून तिकडे निर्यात कमी होत आहे. हे ही कारण दर कमी होण्याचं असल्याचे भुसे म्हणाले. 


ते पुढे म्हणाले, नाशिक (Nashik) जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात देखील कांदा उत्पादन करत आहे. हे ही कारण दर पडण्याचं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब यांना आश्वस्त केलं आहे. फार्मर प्रोड्युसर कंपन्याना देखील खरेदी करण्याची विनंती करणार आहोत. दरम्यान नाफेडबाबत शेतकऱ्याकडून तक्रार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची मागणी असेल तर त्याची चौकशी केली जाईल. कोणत्या शेतकऱ्याचा कांदा खरेदी केली जाईल, याची देखील माहीत दिली जाईल. व्यापाऱ्यांच्याच कंपन्या असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. स्पेसिपिक तक्रार आल्यास कंपन्यांवर कारवाई केली जाईल. कमी साइजच्या कांद्याची खरेदी करण्याची सूचना करणार असल्याचे भुसे म्हणाले. 


शेतकऱ्याकडून फुकट कोथिंबीर वाटप


दरम्यान कोणत्याही पिकाच्या उत्पादनावर खरेदीवर दर अवलंबून असते. किती शेतकरी कोणतं पीक घेत आहे, याची माहिती मिळणार असून यामुळे कोणत्या शेतीकडे वळावे हे समजेल. तूर खरेदीबाबत निर्णय घेतला असून इतकी तूर झाली की सरकारला खरेदी करावी लागेल. तर  दुसरीकडे नाशिकमधील तरुण शेतकऱ्याने मेथी, कोथिंबीर मोफत वाटली. नाशिकमध्ये एका तरुण शेतकऱ्याने कोथिंबीर, मेथी फुकट वाटली, त्याच्या डोळ्यात पाणी होते. पण घेणाऱ्यांनी गाडी भरून भरून नेल्या, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार असे सांगत भुसे यांनी नागरिकांना सुनावले. राज्य सरकारने अनेक योजना आणल्या, कालचं बजेटही अशाच शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून केले आहे. फुकट कोथिंबीर घेणाऱ्यानी पण थोडे पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर शेतकऱ्याला थोडी प्रेरणा मिळाली असती, असेही ते म्हणाले. 



राष्ट्रवादी कांदा आंदोलन


कांद्याच हे चक्र दोन वर्षाने येत असते, अशा शेतकऱ्यांना मदत केली जाईल. अशा विषयांवर राजकारण करण्यापेक्षा काय मार्ग काढला पाहिजे? याच्यावर विचार व्हायला हवा. तर मुंबईत द्राक्ष शेतकऱ्यांना माल विकू दिला नसल्याही घटना घडली. यावर भुसे म्हणाले की, त्यांच्यासोबत बोललो असून मार्ग काढून त्यांना व्यवस्था करून दिली. रहदारी, अडथळा होता का? याची सगळी माहिती घेत असल्याचे ते म्हणाले. तर नामांतरावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरु आहे. यावर भुसे म्हणाले की, आंदोलन करण्याची कीव येते. त्यांच्या विषयी काय शब्द वापरावे. आपल्या मंदिरांची विटंबना केली, महिलांची विटंबना केली म्हणून ते नाव मिटवायला हवे. उलट त्याचं स्वागत व्हायला हवं. मात्र काहीतरी मूठभर लोक असं करत आहेत.