Nashik Sharad Pawar : सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना खते घेण्यासाठी जात विचारण्यात येत असल्याचं ही इ पॉश मशीन मधून समोर आलं. यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भूमिका मांडली आहे. या आधी असं कधीही घडलं नाही, जर समजा असं विचारत असतील तर? असं का विचारत आहेत? हे अत्यंत चुकीच आहे, त्याची माहिती आम्ही घेत असल्याचं पवार म्हणाले.


शरद पवार हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून शहरात आगमन झाल्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सांगलीतील प्रकारावर प्रतिक्रिया देत अधिक माहिती घेत असल्याचे म्हणाले. रासायनिक खत खरेदी करताना शेतकर्‍यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत असल्याचा प्रकार सांगलीत (Sangli) घडला आहे. यावरून विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले. यावेळी पवार म्हणाले की, असं कधीही घडलं नाही. जर समजा असं विचारत असतील तर? असं का विचारत आहेत? हे अत्यंत चुकीच आहे, त्याची माहिती आम्ही घेत असल्याचे पवार म्हणाले. 


सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती नसून काही ठिकाणी माल खरेदी केला जात असल्याचे दिसत आहे. मात्र नाफेड कांदा खरेदीच करत नसल्याचं शरद पवार म्हणाले, नाफेडच्या माध्यमातून जी बाहेरच्या केंद्रावर खरेदी केली जात आहे, ती साधारण 950 च्या आसपास आहे, मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नाफेड जर खरेदी करत असेल तर साधारण बाराशे तेराशे रुपयांचा भाव कांद्याला मिळाला पाहिजे. निदान बाराशे रुपये भाव मिळाला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले आहेत. 


शरद पवार पुढे म्हणाले की, मध्यप्रदेश, गुजरात (Gujrat), आणि राजस्थान सरकारने काही ना काही दर सुरू केले आहेत, मात्र महाराष्ट्रात अद्यापही सरकारची चर्चा सुरू आहे. सरकारच्या कंपन्यांनी बाजार समितीत उतरून कांदा खरेदी करणे आवश्यक आहे, आज जे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे, कांदा पीक हे जिरायत शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे. आमच्याकडे बागायती शेतकरी ऊस शेती करतो, मात्र बागायत शेतकरी आणि जिरायत शेतकरी यात जमीन अस्मानचा फरक असल्याचे पवार म्हणाले, त्यामुळे जिरायत शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यात कांदा अत्यंत महत्वाचे पीक आहे. शेतकऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे, मग अनुदान द्या, अथवा खरेदी करा, पण शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, असे आवाहन शरद पवार यांनी राज्य सरकारला केले. 


शेतकऱ्यांना जात विचारणं चुकीचं... 


अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) जिल्ह्यातील अनेक पिकांना फटका बसला आहे. यात महत्वाचे पीक असलेल्या द्राक्ष पिकांवर परिणाम झाला आहे. याबाबत शरद पवार म्हणाले की सद्यस्थितीत आम्ही माहिती घेत आहोत आज वेळ मिळाल्यास काही द्राक्ष शेतकऱ्यांना भेटी घेऊन याबाबतची माहिती मिळवणार आहोत त्यानंतर सर्व माहिती एकत्रित करून ती राज्य सरकारला देण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. तसेच सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना खते घेण्यासाठी जात विचारण्यात येत असल्याचं ही ई पॉश मशीन मधून समोर आलं. याबाबत शरद पवार म्हणाले की यापूर्वी 'असं कधीही घडलं नाही. जर समजा असं विचारत असतील तर? असं का विचारत आहेत? हे अत्यंत चुकीच आहे', त्याची माहिती आम्ही घेत असल्याचे पवार म्हणाले. 


भाजपला पाठिंबा दिलेला नाही. 


दरम्यान नागालँड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. यावर शरद पवार म्हणाले की भाजपला पाठिंबा दिलेला नाही. नागालँडमध्ये कुठलाच पक्ष बाहेर राहिलेला नाही. सगळे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. एक काळ असा होता की या ठिकाणी नागा संघटना देश विघातक कार्यक्रम घेत होते. या सर्वांना एकत्र आणावं आणि या गोष्टी टाळाव्यात यासाठी प्रयत्न येथील मुख्यमंत्र्यांनी केला होता. ते मुख्यमंत्री भाजपचे नाहीत. आमचे जे काही सात उमेदवार निवडून आलेत, ते देखील म्हणाले आहेत की 'आम्ही भाजपबरोबर जाणार नाहीत', मात्र मुख्यमंत्र्यांकडून ऐक्याच्या दृष्टीने काही पावलं टाकली जात असतील तर आम्ही त्यास नकारात्मक दृष्टीने बघणार नाही' त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत जात आहोत, असेही शरद पवार यांनी सांगितले.