(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Sanjay Raut : साडेतीनशे वर्षांपूर्वी दिल्लीतून संकट आलं होत, पुन्हा महाराष्ट्रावर तेच संकट आलंय, संजय राऊतांचा इशारा
Nashik Sanjay Raut : हर हर महादेवची गर्जना, हातात भवानी तलवार घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन ठामपणे उभे राहायचे आहे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
Nashik Sanjay Raut : आपल्या महाराष्ट्रावर 350 वर्षांपूर्वी औरंगजेबाचे (Aurangajeb), अफजलखानाचे (Afjalkhan), शायिस्तेखानाचे, निजामशाहीचे संकट होते, हे संकट देखील दिल्लीवरून (Delhi) आले होते. आज तेच संकट इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रावर येत आहे. हर हर महादेव या गर्जनेसह पेटून उठून हातात भवानी तलवार घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन ठामपणे उभे राहायचे आहे, असे आवाहन संजय राऊत (sanjay Raut) यांनी ठाकरे गटातील शिवसैनिकांना केले.
संजय राऊत हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून सिन्नर तालुक्यातील एका मंदिराच्या सोहळ्यासाठी ते सिन्नरमध्ये आहेत. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सुनील बागुल यांच्याबरोबर एक अनोळखी गृहस्थ माझ्याकडे आल्यानंतर माझ्यासमोर कीर्तन सुरू केले. मला म्हटले मंदिर बघण्यासाठी तुम्हाला यायलाच पाहिजे. मी कोणताही विचार न करता म्हटलं की तुम्ही काही काळजी करू नका, नक्की येईन. त्यानंतर बबन महाराजांनी आमंत्रण दिलं. या ठिकाणी आल्यावर असं वाटलं की एखाद्या पवित्र श्रद्धास्थानी आलो आहे. माझ्यावर, आमच्या पक्षावर, महाराष्ट्रावर जे संकट आले आहे, त्याला थोपवण्याची ऊर्जा, प्रेरणा या श्रद्धास्थानात असल्याचे दिसते, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, व्यासपीठावर बसलेले अनेकजण बुवा बाबांचे भक्त आहेत. आजपासून मला अस वाटतंय की मी इथे अधूनमधून येऊन प्रेरणा घेत जाईन. उद्धव ठाकरे यांना इथं बोलवायला पाहिजे, असे आपण म्हणालात. पण आज जे संकट आहे, ते दूर झाल्यावर आम्ही सगळेच इथे येऊ, आम्हाला गुवाहाटीला जायची गरज नाही. आम्हाला तिकडे जाऊन जादूटोणा करण्याची गरज नाही, आम्हाला रेडे शोधण्याची गरज नाही, या महाराष्ट्रात माथा टेकवण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी इतकी पवित्र जागा असताना, याशिवाय दुसरी जागा दिसत नाही. ज्या संख्येने आपण इथं जमलेलो आहोत, आपण प्रत्येकाने या देवस्थानाचा अनुभव घेतलेला आहे. आज या महाराष्ट्राला कोणती गरज असेल तर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना टिकवण्याची ते काम आपण सर्व करणार असल्याचे सांगत शिवसैनिकांना एकप्रकारे आवाहन केले.
350 वर्षांनी महाराष्ट्रावर संकट
यावेळी सद्यस्थितच्या राजकारणावर ते म्हणाले की ,आपल्या महाराष्ट्रावर 350 वर्षांपूर्वी औरंगजेबाचे, अफजलखानाचे, शायिस्तेखानाचे, निजामशाहीचे संकट होते, हे संकट देखील दिल्लीवरून आले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून, जाती-पातीच्या भिंती तोडून सगळे आपण मराठी आहोत, महाराष्ट्राचे आहोत म्हणून लढत राहिलो, हे हिंदवी स्वराज्य स्थापन केल. आज तेच संकट इतक्या वर्षांनी आपल्या महाराष्ट्रावर येत आहे . हर हर महादेव या गर्जनेसह पेटून उठून हातात भवानी तलवार घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन ठामपणे उभे राहायचे आहे, असे आवाहन संजय राऊत यांनी ठाकरे गटातील शिवसैनिकांना केले.
अमित शाहांना महाराष्ट्र कळणार नाही...
तुम्ही कामात प्राण आणि आत्मा ओतलात, तर ते काम थांबत नाही, श्रद्धेतून निर्माण झालेली कामे असून इथं व्यापाऱ्याला स्थान नाही, अनेकदा आपण एखाद्या देवस्थानाला जागृत देवस्थान का म्हणतो तर मंदिरातील मूर्तीला लाखो लोकांनी श्रद्धेने हात लावलेला असतो. त्यातून त्या मूर्तीमध्ये जागरूकता येते. बुवाजी महाराजांचे स्थान तसेच असून हजारो लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. त्यातून त्या मूर्तीमध्ये व आपल्यामध्ये ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. सत्ता येते सत्ता जाते, जर अशा देवस्थानाकडे लाखो लोक येतात, अशा ठिकाणी रस्ता असणे आवश्यक आहे. मात्र मी आभारी आहे, आपण मला आमंत्रण दिले, राजकारणामध्ये ऊन सावल्यांचा खेळ सुरू असतो. या मंदिराचे घुमट, कळस हाच आपला महाराष्ट्र आहे, आणि हा महाराष्ट्र अमित शहाला कळणार नाही, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लागलेला.