(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Satyajeet Tambe : नाशिकमध्ये शिंदे गटाच्या आरोग्य शिबिरात आमदार सत्यजित तांबेंची हजेरी, म्हणाले..
Nashik Satyajeet Tambe : नाशिकमध्ये शिंदे गटाच्या कार्यक्रमात आमदार सत्यजित तांबे यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
Nashik Satyajeet Tambe : नाशिकमध्ये (Nashik) शिवजयंती निमित्त आयोजित आरोग शिबिराच्या बॅनरवर अपक्ष आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe)) यांचा फोटो होता. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून स्वतः आमदार सत्यजित तांबे यांनी खुलासा केला आहे. लोकांच्या हिताचा कार्यक्रम असून अशा पद्धतीच्या आरोग्य शिबिरे होणं आवश्यक आहे, त्याच भावनेतून आलो असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक (Nashik) शहरात शिवजयंतीच्या (Shivjayanti) आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने बॅनर लावण्यात आले आहेत. या शिंदे गटाच्या बॅनर्सवर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांचा फोटो झळकला आहे. शिवजयंतीनिमित्त शिंदे गटाच्यावतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचे बॅनरवर शिंदे गटातील काही प्रमुख नेत्यांसोबतच सत्यजित तांबे यांचा फोटो झळकला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होत. शिवाय या आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात आमदार सत्यजित तांबे यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र सत्यजित तांबे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं.
आज आरोग्य शिबिराच्या दादा भुसेंसंह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी भेट दिली. यावेळी यावेळी एका पदाधिकाऱ्याने सांगितले कि थोड्याच वेळात आमदार सत्यजित तांबे हे देखील कार्यक्रमस्थळी येणार आहेत. शिवाय बॅनरवर फोटो झळकला असून त्यांनाही आमच्याकडे घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असेही बोलता बोलता त्यांनी सांगितले. यानंतर बॅनरवरील फोटो आणि या विधानानंतर आणखी चर्चा रंगल्या. मात्र काही वेळानंतर सत्यजित तांबे स्वतः कार्यक्रमस्थळी हजर झाले. त्यांनी कार्यक्रमाला हजर राहण्याचे कारणही सांगितले.
आमदार सत्यजित तांबे यावेळी म्हणाले कि ज्या ज्या वेळेस आम्हाला गरज पडते, त्या त्या वेळेस शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मदत घेतली जाते. हे शिवसेनेचे आहे, की आम्ही वेगळ्या पक्षात आहोत हे बघितलं जात नाही आणि तेही बघत नाही कि कोणत्या पक्षाच्या माणसाचा फोन आला ते... 24 तास 365 दिवस वैद्यकीय सहाय्यता कक्षातून लोकांना मदत केली जाते. कोरोना काळात एका जवळच्या माणसाचा ठाण्यात मृत्यू झाला होता, त्यावेळी अंत्यविधी करण्यासाठी कुणीही नव्हतं. तेव्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाल ही बाब सांगितली. त्यांनी तात्काळ टीम पाठवली. त्यावेळेस त्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यात आला. कोरोना काळात अनेक वेळा त्यांनी आम्हाला मदत केली आहे. रेमडेसीवर असो कि बेड असो कि अन्य काही औषधांचा पुरवठा मदत कक्षाने केला आहे. आरोग्याच्या कामासाठी निधीची आवश्यकता असल्यास आम्ही त्यांची मदत घेत असतो, म्हणूनच आज शिंदे गटाच्या या आरोग्य शिबिराच्या कार्य्रक्रमासाठी आलो असल्याचे सत्यजित तांबे म्हणाले.