एक्स्प्लोर

Nashik Bribe : महसूल, शिक्षणनंतर आता पोलीस विभाग आघाडीवर, नाशिकमध्ये दोन पोलीस लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Nashik Bribe : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक केली आहे.

Nashik Bribe : नाशिक शहरात दिवसेंदिवस लाचखोरीच्या (Bribe) घटनांनी ऊत आणला आहे. एकीकडे नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासकीय कार्यालये, अधिकारी कार्यरत असताना हेच अधिकारी पैशांशिवाय काम करत नसल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे. यात महसूल विभागासह शिक्षण त्याचबरोबर पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्ग देखील लाच घेताना रंगेहाथ आढळून येत आहेत. त्यामुळे तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. 

दरम्यान नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) शिक्षण विभागात महत्वाची कारवाई करण्यात आली. मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. आता याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायाला ताब्यात घेतले आहे. येवला तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय नारायण शिंदे याला तीन हजार रुपयांची तर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे शिपाई करण गंभीर थोरात याला 4000 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

येवला तालुका ग्रामीण पोलीस (Yeola Police Station) ठाण्यात कार्यरत असलेल्या विजय नारायण शिंदे या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराच्या पत्नीने येवला तालुका पोलीस स्टेनशमध्ये दिलेल्या अदखलपात्र तक्रारीवरुन, संशयितावर कारवाई करण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र तक्रार अर्जानुसार दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून चार हजार रुपये लाचेची मागणी शिंदे यांनी केली होती. यातील तीन हजार रुपयांचा पहिला हफ्ता पंचायत समक्ष स्वीकारताना शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस कर्मचारीही आघाडीवर 

तर मालेगाव शहरातील (Malegaon) तालुका पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे. तक्रारदाराच्या बहिणीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याकरता चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना तालुका पोलीस ठाण्याचा कर्मचारी करण गंभीर थोरात यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर मंगळवारी (6 जून) ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या बहिणीविरुद्ध दारुबंदी कायद्यांतर्गत मालेगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे पोलीस कर्मचारी करण थोरात यांनी चार हजार रुपये मागितले होते. पंचायत समक्ष लाच स्वीकारताना संशयित सापडल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहू्र्त; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहू्र्त; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरण; आरोपी कोण? आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख, वकील नेमकं काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 3PM 25 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Police Custody : प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टाचा निकालAsim Sarode On Prashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरने आलिशान गाड्या कुठून आणल्या याचा शोध घ्यावा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहू्र्त; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहू्र्त; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याच्यामागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याच्यामागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Embed widget