Power Supply in Kashmir Valley : काश्मीर खोरे लक्ष दिव्यांनी लखलखणार, नाशिकच्या सुरेश कपाडिया यांची कमाल
Power Supply in Kashmir Valley : जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पवन ऊर्जा प्रक्लपाच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येणार असून यासाठी नाशिकच्या सुरेश कपाडिया यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
Power Supply in Kashmir Valley : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashamir) पहिल्यांदाच पवन ऊर्जा प्रक्लपाच्या (Power Project) माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येणार असून यासाठी नाशिकच्या सुरेश कपाडिया (Nashik ) यांनी विशेष मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्णत्वाला गेल्यानंतर काश्मीर खोरे उजळणार आहे.
नाशिकचे उपक्रमशील असलेले सुरेश कपाडिया (Suresh Kapadia) यांनी काश्मीर खोऱ्यात आशेचा किरण पेटवला असून लवकरच या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने कपाडिया यांचे प्रयत्न सुरु केले आहेत. येथील परिसर हा भारत- पाकिस्तानच्या चेकपोस्टवर आहे. या ठिकाणी विजेचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात असतो. येथील परिसरात वसलेली छोटी छोटी गाव, नागरिक आदींना या समस्येचा त्रास होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन कपाडिया यांनी येथे पवन ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सद्यस्थितीत या परिसरात डिझेलच्या माध्यमातून विद्यूत पुरवठा केला जातो. मात्र यासाठी लाखो लिटर डिझेलची आवश्यकता भासते. परिणामी खर्च मोठ्या प्रमाणावर होत असतो. असं लक्षात आल्यानंतर या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याची संकल्पना सुरेश कपाडिया यांनी मांडली. त्यानुसार लवकरच या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सदर ठिकाणी पवन ऊर्जा प्रक्लपासाठी अनुकूल परिस्थिती असून येथे नदी, हवा आदी संसाधने उपलब्ध असल्याने पवन ऊर्जा प्रकल्पाची संकल्पना यशस्वीरित्या राबविली जाऊ शकते, अशी माहिती सुरेश कपाडिया यांनी दिली.
हजारो लिटर डिझेल वाचणार
दरम्यान सदर पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास या परिसरात ऊर्जेची समस्या काही अंशी मिटणार आहे. या पवन ऊर्जा प्रकल्पामुळे एलओसी जवळील गावांना २४ तास लाईट मिळणार आहे. सद्यस्थितीत या गावांना अवघा दोन ते तीन तास विदयुत पुरवठा होत असतो. त्यातही हजारो लिटर डिझेल यासाठी खर्च केले जाते. म्हणेजच विद्युत पुरवठा करण्यासाठी जनरेटर लावावे लागते. अन त्यातून पुढील आवश्यक त्या वेळी दिवसांतून दोन ते तीन तास विद्युत पुरवठा केला जातो. मात्र हा पवन ऊर्जा प्रकल्प झाल्यास हजारो लिटर डिझेल वाचणार आहे. विशेष म्हणजे आता आर्मीच्या शेवटच्या चेक पोस्टपर्यंत विद्युत पुरवठा होणार आहे.
नाशिक सुरेश कपाडिया हे कापड व्यावसायिक आहेत. मात्र त्यांना वेगवेगळे नवोपक्रम करायला आवडते. यासाठी त्यांनी अभय युमीफायर आरकीन व्हेंचरची स्थापना देखील केली आहे. या द्वारे विविध संकल्पना राबविल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काश्मीरच्या खोऱ्यात ऊर्जा प्रकल्पाची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने त्यांनी पायाभरणी सुरु केली आहे. लवकरच हा ऊर्जा प्रकल्प उभा राहून इथल्या नागरिकांना प्रकाशमान करेल यात शंका नाही.