Nashik Police : नाशिक पोलिस दल झालं सुसाट, तब्बल एक कोटी 53 लाखांची नवी वाहने, गुन्हेगारीचं काय?
Nashik Police : नाशिक पोलीस दलात (Nashik city Police) तब्बल एक कोटी 53 लाख 17 हजार रुपये खर्च करून 21 नवीन वाहने दाखल झाले आहेत.
Nashik Police : नाशिक पोलीस दलात (Nashik city Police) तब्बल एक कोटी 53 लाख 17 हजार रुपये खर्च करून 21 नवीन वाहने दाखल झाले आहेत. त्यामुळे आता पोलीस दलाचा वेग वाढला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचा (Crime) जो वेग वाढला आहे, तो पोलिसांना कमी करण्याची खरी गरज आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांचा 'रिस्पॉन्स टाइम' अधिक कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
नाशिक शहर पोलिस (Nashik) दलाच्या ताफ्यात नवीन 21 मोटारीची भर पडली. जिल्हा नियोजन समितीच्या (Nashik District) माध्यमातून पोलिस आयुक्तालयाला मिळालेल्या निधीतून नव्या कोऱ्या कारची खरेदी करण्यात आली. या मोटारी पोलिस सेवेत दाखल (Police Vans) झाल्यामुळे आता पोलिस दलाची ताकद अधिक वाढली आहे. नाशिक आयुक्तालयातर्फे जिल्हा नियोजन समितीकडे मागील काही वर्षांपासून वाहने खरेदीसाठी निधीची मागणी केली जात होती. आयुक्तालयाला नव्या काही वाहनांची निकड प्रकर्षाने जाणवत होती. वाहनांची संख्या कमी असल्यामुळे पोलिस गस्तीवर देखील त्याचा परिणाम होत होता. परिणामी शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यात 'अडथळे येत होते.
तसेच नाशिक शहरातील 14 पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखांच्या पथकांनाही वाहनांची गरज भासते. बहुतांश वाहने जुनी झाल्यामुळे त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा आर्थिक खर्चाचा बोजा आयुक्तालयाच्या तिजोरीवर पडत होता. त्यामुळे नव्या वाहनांची गरज निर्माण झाली होती. तत्कालीन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे ज्यांनी याबाबत प्रस्ताव तयार करून 17 वाहनांची मागणी केली होती. विद्यमान पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पाठपुरावा करत त्यामध्ये आणखी चार वाहनाची भर टाकली. अखेर जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळाल्याने नवी 21 वाहने पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते हिरवा झेंडा या वाहनांच्या ताफ्याला दाखवण्यात आला.
पोलिस ठाण्यांची अडचण सुटणार
नाशिक पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनाही वाहने दिली जाणार आहेत. यामुळे पोलिस निरीक्षक यापूर्वीच्या इर्टिगा कार मोबाइल गस्ती पथकाकडे येतील. दरम्यान नव्या वाहनांमध्ये काही इर्टिगा कार तर काही महिंद्राच्या बोलेरो कार आहेत. या पोलिस ठाण्यांकडे वाहनांची संख्या अपुरी आहे. त्यांना प्राधान्य- माने वाहने दिली जाणार असल्याचे समजते. शहर वाहतूक शाखा, गुन्हे शाखांच्या विविध पथकांनाही यामधून वाहने मिळणार आहेत.
गुन्हेगारीचा वेग कमी होणार का?
नाशिक पोलीस दलात तब्बल एक कोटी 53 लाख 17 हजार रुपये खर्च करून 21 नवीन वाहने दाखल झाले आहेत. त्यामुळे आता पोलीस दलाचा यांत्रिकी वेग वाढला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचा जो वेग वाढला आहे, तो पोलिसांना कमी करण्याची खरी गरज आहे. महिला मुलींची रस्त्याने चालताना छेड काढली जाते, कोयता गॅंगची वाढलेली दहशत, दिवसाढवळ्या होणारे खून, गोळीबार सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटना हे सुरूच आहे. त्यामुळे आता नाशिक शहर पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या वाहनांमुळे पोलीस दलाचा गुन्हेगारी रोखण्याचा वेग वाढणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.