एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकमध्ये पाच हजाराहून अधिक हॉटेल्स मात्र तपासणीसाठी एकच टीपीसी यंत्र, मनुष्यबळाचाही अभाव

Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील जवळपास पाच हजाराहून अधिक हॉटेल्स (Hotels) असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या एका टीपीसी (TPC Unit) यंत्रावर सगळा भार आल्याचे चित्र आहे. 

Nashik News : श्रावण महिना (Shravan Mahina)  म्हटला कि सण उत्सव मोठ्या प्रमाणावर येत असतात. आणि यंदा कोरोनाचे (Corona) निर्बंध शिथिल झाल्याने सण उत्सव जोरात साजरे होत आहेत. या सण उत्सवात गोड खाद्यपदार्थांना मागणी वाढली असून इतर तेलात केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना मागणी असते. मात्र अनेकदा भेसळयुक्त खाद्यपदार्थ (Adulterated food) बाजारात विक्रीसाठी ठेवले जातात. या सर्वांना आळा घालण्यासाठी नाशिकच्या (Nashik) अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) सतर्क झाले आहे. मात्र तपासणीसाठी एफडीए कडे एकच टीपीसी यंत्र असल्याची बाब समोर आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाकडून धडक मोहीम हातात घेण्यात आली आहे. या माध्यमातून शहरातील भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्या तसेच खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या विरुद्ध कारवाई मोहीम सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच एक कोटी रुपयांच्या आसपास खाद्यतेलाची डबे जप्त  करण्यात आले होते. मात्र असे असताना सद्यस्थितीत अन्न व औषध प्रशासनाकडे मात्र एक टीपीसी यंत्र असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील जवळपास पाच हजाराहून अधिक हॉटेल्स असल्याने या एका टीपीसी यंत्रावर सगळा भार आल्याचे चित्र आहे. 

अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव (Ganehotsav) असून त्यानंतर नवरात्र, दिवाळी (Diwali असे मोठे सण उत्सवाचे दिवस आहेत. या सण उत्सवाच्या काळात मिठाईंना अधिक मागणी असते. नाशिकमध्ये जबळपास पाच हजाराहून अधिक हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले जातात. मात्र काही हॉटेल्समध्ये स्वच्छता पाळली जात नाही, तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर या सर्वांचा परिणाम होताना दिसतो. याचसाठी या पदार्थांचा दर्जा राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग गतिमान होण्याची शक्यता आहे. मात्र अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी या यंत्रणेकडे खाद्यतेलाचे टोटल पोलर कंपाऊंडचे रीडिंग घेण्यासाठी एकच टीपीसी यंत्र असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे वेढ्या सगळ्या हॉटेलांची तपासणी मोहीमेचा भार एका यंत्रावर आला आहे. 

प्रशासनाची धडक मोहीम मात्र ...
दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली खरी मात्र प्रशासनाकडे असणाऱ्या गोष्टीचा अभाव असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक हॉटेल्स काहीही स्वच्छता न ठेवता अशाच पद्धतीने हॉटेल्स व्यवसाय चालवत आहेत. सध्या प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी भेट जिकिरीचे होत आहे. त्यामुळे तातडीने या गोष्टीचा पुरवठा होऊन प्रशासन गतिमान होणं आवश्यक आहे. संपूर्ण जिल्ह्यात 5703 हॉटेल, रेस्तराँ चालकांची नोंदणी झाली आहे. मात्र खाद्यतेलाचे पोलार कंपाउंडचे रीडिंग घेण्यासाठी एकच टीपीसी यंत्र असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

मनुष्यबळाचा अभाव
दोन महानगरपालिकासह 15 तालुक्यांसाठी केवळ नव अन्नसुरक्षा अधिकारी जिल्ह्यातील नाशिक व मालेगाव महापालिकेचे 15 तालुक्यातील कामकाज बघण्यासाठी केवळ नव अन्नसुरक्षा अधिकारी असून त्यांना मदतीसाठी नमुना सहाय्यक नसल्याने कारवाई कशी करावी असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उभा आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांना छापा टाकण्यासाठी साधे वाहन नाही. कार्यालयात डाटा ऑपरेटर नाही, नमुना सहायक नाही, अद्ययावत प्रयोगशाळा नाही, परिणामी कायद्याप्रमाणे 14 दिवसांत नमुन्यांचा अहवाल येणे गरजेचे असताना चार ते सहा महिन्यातच पर्यंत अहवालच येत नाही अशी धक्कादायक माहिती समजते आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget