एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Nashik News : नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप; भाजपकडून उमेदवार जाहीर?

Nashik News : नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याचे समजते आहे. 

Nashik News : अखेर विधान परिषदेच्या (Vidhan Parishd) नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Padvidhar) भाजपचा उमेदवार (BJP Cadidate) जाहीर झाला असून राजेंद्र विखे (Rajendra Vikhe) यांच्या नावावर भाजपकडून जवळजवळ शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. औपचारिक घोषणा बाकी असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 

नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला अवघा एक दिवस शिल्लक असताना भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याचे समजते आहे. लपर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाणारा याबाबत खलबते सुरु होती. अनेकांची नावे देखील घेतली जात होती. अनपेक्षित उमेदवारी दिली जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली होती, अखेरच्या क्षणी भाजपकडून उमेदवार जाहीर झाला असल्याची माहिती मिळते आहे. याबाबतची औपचारिक घोषणा अद्याप बाकी असून राजेंद्र विखे यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते आहे. 

नाशिक पदवीधर निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून आता अवघे दोन दिवस नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास बाकी आहेत. त्यामुळे उमेदवार शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करणार निश्चित होते. एकीकडे नाशिक पदवीधरांसाठी काँग्रेसचा उमेदवार निश्चित होता तरी नामनिर्देशन अर्ज काही दाखल करण्यात आला नव्ह्ता. तर दुसरीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निश्चित होत नव्हता, त्यामुळे नाशिकच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत नव्हते. मात्र आता या सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून राजेंद्र विखे यांच्या नावावर भाजपकडून जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. राजेंद्र विखे यांच्या नावाला वरिष्ठ नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे समजते आहे. 

दरम्यान कालच भाजप आमदार राम शिंदे म्हणाले होते कि, नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करत असताना त्याच्यावर विचार विनिमय सुरु आहे. आमच्यासमोर अनेक नाव आहेत, त्यापैकी वेगवेगळी मतमतांतर समोर येत असल्याकारणाने विलंब होत आहे... पाच जिल्ह्याचा व्याप असल्यामुळे आणि ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून नेतृत्व त्याच्यावर चर्चा करत आहे. आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे निर्णय व्हायला वेळ लागत आहे, मात्र पक्षाने ही जागा काहीही करून जिंकायचे ठरवले असल्याने योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. त्याचबरोबर आमच्याकडे राजेंद्र विखे , मीनाक्षी  पाटील , धनंजय विसपुते ही नावं आहेत, असे त्यांनी उघडपणे सांगितले होते. अखेर या नावांपैकीच राजेंद्र विखे यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारचे नाव 11 जानेवारीपर्यंत निश्चित केले जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज नाशिक पदवीधर साठी राजेंद्र विखे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. 

काँग्रेस-भाजपात टक्कर 
दरम्यान आता नाशिक पदवीधर मदतरसंघात भाजपचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर या मतदारसंघातील टक्कर उघड झाली आहे. काँग्रेसकडून यापूर्वीच सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय या मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत. त्यामुळे भाजपचा उमेदवार निश्चित झाला असल्याने नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निडणूकीचे चित्र पुढे आले आहे. डॉ. राजेंद्र विखे हे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लहान बंधू आहेत. डॉ. विखे पाटील हे राजकारणात नाहीत, मात्र ते प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती तथा प्रवरा मेडकल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik News: घोडं, मैदान फार लांब नाही, लवकर समजेलच; नाशिकच्या ठाकरे गटाचा शिंदे गटाला इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget