एक्स्प्लोर

Nashik Crime : पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत, एका महिन्यात हल्ल्याच्या आठ घटना

Nashik Crime : नाशिक शहरात गेल्या एका महिन्यात हल्ल्याच्या आठ घटना घडल्या आहेत.

Nashik Crime : बहिणीची छेड काढणाऱ्या टोळक्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये (Nashik) समोर आली आहे, यात बहिणीलाही मारहाण करण्यात आली असून दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे नाशिक शहरात गेल्या एक महिन्यात कोयत्याने हल्ला करण्यात आल्याच्या आठ घटना घडल्या आहेत. तर 11 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाल्याने नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण होत असून पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही कोयता गॅंगची (Koyata Gang) दहशत बघायला मिळते आहे.

तारीख 5 फेब्रुवारी.. वेळ सायंकाळी सात वाजता.. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरातील गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या अंबड परिसरातील मोरवाडी गावाजवळ एक 19 वर्षीय युवती खाजगी क्लासवरून घरी जात असतानाच सहा जणांच्या टोळक्याने तिला रस्त्यात अडवले आणि त्यातील एकाने तिची छेड काढत शिवीगाळ केली. दरम्यान घाबरलेल्या अवस्थेतील युवतीने घरी जाऊन आपल्या भावाला हा प्रकार सांगताच भाऊ या टोळक्याला जाब विचारण्यासाठी गेला असता या टोळक्याने थेट धारदार कोयत्याने भावावर वार करत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान भावाला वाचवण्यासाठी मधे पडलेल्या बहिणीच्याही हातावर कोयत्याचा घाव लागला असून सध्या दोघेही बहीण भाऊ गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सोमवारी प्राणघातक हल्ला आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा पैकी चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. तर कोयत्यासह धारदार शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाया देखील केल्या जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.   

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने कळस गाठलाय. विशेष म्हणजे पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये देखील कोयता गॅंगची दहशत बघायला मिळते असून गेल्या एकच महिन्यात शहरातील भद्रकाली, उपनगर, अंबड, गंगापूर अशा विविध भागात कोयत्याने हल्ल्या झाल्याच्या 8 घटना समोर आल्या आहेत. भरवस्तीत सर्रासपणे कोयत्याने एकमेकांवर हल्ले चढवले जात आहेत. अंबड परिसरातील एका हार्डवेअर दुकानातून पोलिसांनी 12 कोयतेही हस्तगत केले होते. याव्यतिरिक्त शहरात 5 प्राणघातक हल्ल्याचे प्रकार घडले आहेत तर चिंताजनक बाब म्हणजे महिलांची राजरोजपणे छेड काढली जात असून पोक्सोसह विनयभंगाचेही 11 गुन्हे दाखल झाल्याने महिलांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

नाशिक पोलिसांकडून विविध पथकांची स्थापना करून कारवाया जरी केल्या जात असल्या तरी मात्र दुसरीकडे शहरातील गुन्हेगारीचा हा वाढता आलेख बघता गुन्हेगारांवर पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे अँक्शन मोडवर येणार तरी कधी? असा प्रश्न आता नाशिककर उपस्थित करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget