Saptshrungi Gad Bus Fire : नाशिक बस दुर्घटनेनंतर सप्तशृंगी गडावर बसला लागली आग, आगीचे कारण अस्पष्ट
Saptshrungi Gad Bus Fire : नाशिक (Nashik) बस अपघात दुर्घटनेनंतर (Nashik Bus Fire Accident) सप्तश्रृंगी गडावरही बसला आग लागल्याची घटना घडली आहे.
Saptshrungi Gad Bus Fire : नाशिक (Nashik) बस अपघात दुर्घटनेनंतर (Nashik Bus Fire Accident) सप्तशृंगीगडावरून (Saptshrungi Gad) आणखी एक अपघाताची बातमी समोर येत असून सप्तश्रृंगी गडावर ही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आज पहाटे नाशिक शहराजवळील औरंगाबाद रोडवर बस आणि ट्रकच्या भीषण झाल्यानंतर दुर्दैवाने सप्तशृंगी गडावर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसला आग लागल्यानंतर प्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच प्रवाशांनी बस मधून उड्या मारल्याने प्रवासी सुखरूप बचावले आहेत. मात्र यात बस जळून खाक झाली आहे. स्थानिक नागरिक, रोप वे कर्मचारी यांनी तातडीने बचाव कार्य केल्यानं प्रवासी सुखरूप असल्याचे समजते आहे.
दरम्यान सप्तश्रुंगी गडावर नवरात्री पासून यात्रा होत असते. याच यात्रेसाठी प्रवाशांनी भरलेली बस सप्तश्रुंगी गडावर निघाली होती. दरम्यान गडावर जात असताना अचानक बसला आग लागली. वेळीच आग लागल्याची माहिती प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रवाशांनी बसबाहेर उड्या घेतल्या. मात्र या घटनेतही बस जळाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्याचबरोबर स्थानिक नागरिक आणि गडावरील रोपेवेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत बचावकार्य करून प्रवाशांना सुरखरूप बाहेर काढले. तसेच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
आगीचे कारण अस्पष्ट
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाची बस नाशिक येथून प्रवाशांनी घेऊन सप्तश्रुंगी गडावर गेली होती. यावेळी सप्तश्रुंगी गडावर जात असताना अचानक बसने पेट घेतला. यावेळी प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून बाहेर पळ काढला. दरम्यान आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सर्व प्रवाशी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र वेळीच स्थानिक नागरिकांनी धावपळ करीत प्रवाशांना बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.
नाशिक बस दुर्घटना
नाशिकच्या औरंगाबाद रोड वरील मिरची हॉटेल जवळ आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात बारा लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एकूण 32 प्रवासी जखमी असून जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत मृतांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी डीएनए टेस्ट आणि इतर फॉरेस्निक टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयामध्ये स्थानिक आमदार, पदाधिकारी, शासकीय अधिकारी देखील मोठ्या संख्येने असून जिल्हाधिकारी गंगाधरन डी हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.