Nashik Crime : नाशिकमध्ये चाललंय काय? चौदा दिवसांत सातवा खून, किरकोळ वादातून युवकाची हत्या
Nashik Crime : नाशिक शहरात (Nashik City) खुनाचे सत्र कायम असून मागील चौदा दिवसांत सात खुनाच्या (Murder) घटनांनी शहर हादरले आहे.
Nashik Crime : शहरात सोनसाखळी चोरी आणि घरफोडय़ांचे सत्र कायम असताना त्यामध्ये आता एका पाठोपाठ एक घडलेल्या खुनाच्या घटनांची भर पडली आहे. आज सकाळी गंगापूर पाईप लाईन शिवारात आपापसातील वादात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. पवन पगारे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून खुनांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. एकामागोमाग घडलेल्या या घटनांनी शहर हादरले आहे. आज सकाळी गंगापूर परिसरातील पाईपलाईन शिवारात पवन पगारे नामक तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
दरम्यान आपापसातील वादातुन खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित अतुल अजय सिंग यास पोलिसानी ताब्यात घेतले आहे. गेल्या पंधरा दिवसांत सात खुनाच्या घटना नाशिकमध्ये घडल्या आहेत. आज सकाळी झालेली ही घटना किरकोळ वादातून झाली आहे.
महिला पोलिसांवर हल्ला
दरम्यान हत्येच्या घटनेनंतर संशयित अतुल सिंग यास ताब्यात घेण्यास सांगितले. यानुसार महिला पोलिस कर्मचारी सरला खैरनार या गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्तांनी भेट दिली असून शहरातील एकामागून एक सुरु असलेल्या खून सत्रामुळे नाशिक हादरले आहे.
चौदा दिवसांत सातवा खून
गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनाचे सत्र कायम आहे. आतापर्यंत 14 दिवसांच्या दरम्यान सात खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे नाशिककर हादरलेच आहेत मात्र नाशिक पोलिसही चक्रावले आहेत.