Nashik News : धक्कादायक! रेल्वेखाली उडी घेत मायलेकींनी संपविला जीवनप्रवास, देवळाली कॅम्पची घटना
Nashik News : नाशिकमधील (Nashik) देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथील दोघा मायलेकींनी रेल्वे पुढे झोकून देत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Nashik News : नाशिक शहरासह जिल्ह्यात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून दररोज तीन ते चार आत्महत्या उघडकीस येत आहेत. देवळाली कॅम्प येथील दोघा मायलेकींनी रेल्वे पुढे झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
देवळाली कँम्प बार्नस्कूल जवळ राहणाऱ्या अनिता शिरोळे व राखी शिरोळे या माय लेकीने रेल्वेखाली उडी घेत जीवन संपविले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. देवळाली कॅम्प येथील बार्नस्कूल जवळील मल्हारीबाबा येथे शिरोळे कुटुंब वास्तव्यास आहे. अनिता शिरोळे यांचे पती बाळासाहेब शिरोळे हे रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार म्हणून काम पाहतात. ते कामानिमित्त सोलापूर येथे गेले असल्याने या दोघीच मायलेकी घरी होत्या. या दोघीनी अचानकपणे घरापासून काही अंतरावर असलेल्या पाळदे मळा येथील मुंबईहून-नाशिकरोड कडे येणार रेलवेमार्ग गाठला.
दरम्यान डाऊन लाईनवरून नाशिककडे भरधाव येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसपुढे दोघींनी स्वतःला झोकूल दिले. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. रविवारी सकाळच्या अकरा वाजेपूर्वीच रेल्वे मार्गावर आत्महत्या केली असल्याचे पोलीसांनी सांगितले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचे कारण ?
शिरोळे कुटुंबियातील राखी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. त्यांची मोठी मुलगी विवाहित आहे. तर अनिता शिरोळे आणि राखी शिरोळे या दोघीच घरी होत्या. या मायलेकीने नेमके असे पाऊल का उचलले? याचे कारण समजू शकले आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
शेमजुराला आढळले मृतदेह
देवळाली कॅम्प जवळील पाळदे मळा परिसरात शेतमजूर कामासाठी साठी जात असताना हि घटना उघडकीस आली. या शेमजुरांना रेल्वे रुळाजवळ बेवारस अवस्थेत स्कुटी दिसली. मात्र आजूबाजूला कोणी दिसत नसल्याने त्याने इतरत्र पाहिले असता त्यास दोन्ही महिलांचे महिलांचे मृतदेह आढळून आले. त्यांनी तात्काळ घटनेची देवळाली पोलीस स्टेशनला दिली.
अभियंता तरुणीचा बुडून मृत्यू
सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे शेततळ्यात बुडून एका अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोनल भाऊसाहेब आंधळे (२४) असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. शेततळे पाहण्यासाठी बापलेक गेले होते. यावेळी वडिलांना घरी जाण्यास सांगून सांगून सोनल शेततळे पाहत होती. काही वेळानंतर तिचे वडील पाहण्यासाठी आले असता ती शेततळ्यात बुडाल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने इतर शेतकऱ्यांच्या मदतीने सोनलला बाहेर काढत उपचारासाठी जवळच्या रुग्णलयात नेले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.