Nashik News : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित नाशिकमध्ये मंत्र्यांची मांदियाळी, दानवे, पटोले, गावित यांची उपस्थिती
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) आज राज्यातील महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या (Swatantra Amrut Mahotsav) कार्यक्रमासाठी मंत्र्यांची मांदियाळी शहरात होणार आहे.
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) आज राज्यातील महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती असणार असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मंत्र्यांची मांदियाळी शहरात होणार आहे. त्यामुळे यंत्रणेची चांगलीच धावपळ होणार आहे.
यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने हर घर तिरंगा या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नाशिक मध्ये देखील गेल्या दोन दिवसांपासून विविध कार्यक्रम पार पडले आहेत. अशातच आता राज्यातील काही मंत्री स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी उपस्थित आहेत. यामध्ये भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), नवनिर्वाचित मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit), आणि काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) हे उपस्थित आहेत.
दरम्यान अनेक महिन्यानंतर मंत्री रावसाहेब दानवे हे नाशिक दौऱ्यावर येत असून ते भगूर येथील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाडा, अभिनव भारतचे कार्यालय आदी ठिकाणी ते भेट देणार आहेत. या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ते या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तर दुसरीकडे नव्याने शिंदे सरकारमध्ये मंत्री झालेले विजयकुमार गावित हे देखील नाशिकमध्ये असून ते देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते नाना पटोले आझादी गौरव पदयात्रेसाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान थोड्यात वेळात नाशिकच्या काँग्रेसभवन पासून या पदयात्रेला सुरवात होणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असून नाशिकमध्ये देखील स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा हाेत असताना व श्रावण महिन्यातील अनेक धार्मिक सण-उत्सव लक्षात घेता अपर जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी शहर पोलिस आयुक्तालयाची हद्द वगळून नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश २१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात लागू राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
ठरलं! नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाला मंत्री गिरीश महाजन करणार ध्वजारोहण, हेच होणार पालकमंत्री?
Nashik News : नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमावबंदी, पाच लोकांना एकत्र येण्यास मज्जाव
Nashik Leopard News : मांजरीच्या माग पळाला, छतावरून घरात कोसळला! नाशिक बनतंय बिबट्याचे माहेरघर