Hanuman Birth Place Controversy : अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थान, मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया
Hanuman Birth Place Controversy : अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थान असून प्रत्येक जण त्याची पूजा करतो अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी हनुमान जनस्थळाबाबत दिली आहे.
Hanuman Birth Place Controversy : हनुमान जन्म कुठे झाला याने आता काय फरक पडणार, प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर आहे, प्रत्येक जण त्याची पूजा करतो. हनुमानाचा जन्म अंजनेरीलाच झाला. कोणी काहीही बोलतील पण आपण त्याकडे लक्ष द्यायच की नाही हे ठरवाव, असा निर्वाळा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून सुरु असलेल्या हनुमान जन्मस्थळाबाबत त्यांनी पहिली प्रतिकिया दिली आहे.
त्र्यंबकेश्वर जवळील अंजनेरी येथील हनुमान जनस्थळाचा वाद सुरु झाला आहे. कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविदानंद महाराज यांनी अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ नसून किष्किंदा नगरी असल्याचा दावा करीत नवा वाद उभा केला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हनुमान जन्मस्थळाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले....
हनुमान जन्म कुठे झाला याने आता काय फरक पडणार आहे, राज्यात प्रत्येक गावात हनुमानाची पूजा होते. प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर आहे, प्रत्येक ठिकाणी हनुमानाची पूजा, मग कोणी कितीही म्हटले तरी पूजा करणे थांबणार आहे का? मंदिर मशिद वाद वेगळा? आता काय शिक्कामोर्तब होणार का? अंजनेरी हे हनुमान जन्मस्थान आहे म्हणून त्यामुळे हनुमान जन्म कुठे झाला याने आता काय फरक पडणार? सगळे वाद निरर्थक असून शेतकरी, महागाई असे अनेक प्रश्न राज्यात आहेत. कोणी कुठून ही महाराज आले तरी काय? आता राजकारणातच महाराज आहेत, अंगावर काही टाकून घेतात, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान हनुमान जन्मस्थळाचा वादावरून अंजनेरीचे (Anjneri) ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविदानंद महाराज हे त्र्यंबकेश्वरात ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी अंजनेरी हनुमान जन्मस्थळ नसल्याचा दावा केल्यानंतर हा वाद सुरु झाला. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर-नाशिक (Trimbaekshwer) येथील साधू महंतांनी याबाबत बैठक घेतली असून उद्या नाशिकरोड येथे याबाबत महाचर्चा होणार आहे. त्यामुळे नाशिकचे साधू महंत अंजनेरी जन्मस्थळाबाबत काय भूमिका मांडतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.