एक्स्प्लोर

Nashik Mumbai Highway : नाशिक युवक राष्ट्रवादी लावणार फास्टटॅगला काळे स्टिकर, मंत्री नितीन गडकरींना रस्ता दुरुस्तीचे पत्र

Nashik Mumbai Highway : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गवरील (Nashik Mumbai Highway) खड्ड्यांच्या समस्यांचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंत्री नितीन गडकरींना (Minister Nitin Gadkari) पाठविले आहे.

Nashik Mumbai Highway : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गवरील (Nashik Mumbai Highway) खड्ड्यांच्या समस्यांचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Nashik Youth Congress) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींना (Minister Nitin Gadkari) पाठविले आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत रस्ते दुरुस्त न केल्यास वाहनांवरील फास्टटॅगला (Fasttag) काळे स्टिकर लावण्याचा इशारा देखील पत्राद्वारे करण्यात आला आहे. 
 
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गवर खड्ड्यांचे साम्राज्य (Potholes) पसरले असून वाहनधारकांना कसरत करून रस्त्याचे अंतर पार करावे लागत आहे. पावसाच्या जोरदार सरीमुळे घोटी, इगतपुरी व कसारा घाटात (Kasara Ghat) अनेक अपघात या खड्ड्यांमुळे घडतात. कसारा घाटात अपघात झाल्यास 2 दिवस वाहनाच्या लांब रांगा लागत असून 12-12 तास वाहतूक खोळंबा पहावयास मिळत आहे. 

मुंबई-नाशिक महामार्गावर एकूण 03 टोल नाके असून देखील या महामार्गाची दयनिय अवस्था पहावयास मिळते. दरवर्षी NHAI ला आंदोलनाचा इशारा दिल्यावर रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते. परंतु रस्त्याच्या कामाचा दर्जा खालावलेला असल्याने पुढील वर्षी पुन्हा रस्त्याचे वाटोळे झालेले असते. दिनांक 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्य दिनापर्यंत राष्ट्रीय महामार्ग 03 (मुंबई-नाशिक) वरील खड्डे तातडीने बुजवून दर्जेदार रस्ता करावा, अन्यथा वाहनांवरील फास्टटॅक वर काळे स्टिकर लावण्यात येईल असे पत्रात म्हटले आहे.

मुंबई नाशिक महामार्ग खड्डे न्यायालयात 
दरम्यान मुंबई नाशिक महामार्ग हा दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे मुंबई ते नाशिक, नाशिक ते मुंबई हा मार्ग सुकर झाला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या मार्गावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येते आहे. शिवाय महामार्गावर पडलेल्या  खड्ड्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे मागील वर्षी हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट होते. खड्ड्यांमुळे लोकांना जीव गमावावा लागत असून राज्य सरकारने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याचे सुनावले होते. तसेच तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेशही दिले होते. शिवाय मुंबई नाशिक महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने केंद्र सरकारने त्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याचेही स्पष्ट केले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या

ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
Shobha Bachhav: 'माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन', काँग्रेस खासदाराचा मोबाईल हॅक झाला अन्...; नेमकं काय घडलं?
'माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन', काँग्रेस खासदाराचा मोबाईल हॅक झाला अन्...; नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
Nashik MHADA Scam: नाशिकच्या बहुचर्चित MHADA भूखंड घोटाळ्यात मोठी कारवाई; 1 मंडळ अधिकारी, 3 तलाठी निलंबित, महसूल विभागात खळबळ
नाशिकच्या बहुचर्चित MHADA भूखंड घोटाळ्यात मोठी कारवाई; 1 मंडळ अधिकारी, 3 तलाठी निलंबित, महसूल विभागात खळबळ

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget