Nashik Rain Damage : नाशिक जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा, चार नागरिकांचा मृत्यू, अकरा जनावरे दगावली
Nashik Rain Damage : मान्सूनपूर्व पावसाने (Untimely Rain) जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला असून गुरुवारी झालेल्या पावसात वीज पडून (Lightning Rain) दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अकरा जनावरे दगावली आहेत.
Nashik Rain Damage : मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला असून गुरुवारी झालेल्या पावसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अकरा जनावरे दगावली आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून यामध्ये अनेक तालुक्यात मोठ्या नुकसान झाले आहे. तर चार तालुक्यांत वीज पडून नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक जनावरेही दगावली.
मात्र मान्सूनपूर्व पावसाने राज्यात धुमाकूळ घातला असून नाशिक जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिला सर्वाधिक फटका ग्रामीण भागात बसला असून विजेचा गडगडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह चांदवड, नांदगाव, मालेगावमध्ये मुसळधार पाऊस झाला. नाशिक व सिन्नर तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. मालेगाव मध्ये दोन जनावरे दगावली. नांदगाव तालुक्यात सहा कांदा चाळीचे नुकसान झाले.
चांदवड तालुक्यात सात, मालेगाव तालुक्यात चार कांदा चाळीचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने शाळेचे पत्रे, शेडचे नुकसान झाले. कळवण तालुक्यात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात सायंकाळच्या सुमारास वीज पडल्याने विसापूर शिवारातील शेतमजूर बारकू सोनवणे यांचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यातील तालुक्यात पाऊस होता. जोरदार पाऊस झाल्याने लवकरच पेरण्यांसाठी शेतकरी वर्गाची धावपळ सुरू होणार आहे.
सटाणा परिसरात बैल जोडीचा मृत्यू
सटाणा शहराजवळील केरसाने येथे शुक्रवारी सायंकाळी पावसादरम्यान वीज कोसळल्याने सुरेश माळी या शेतकऱ्याच्या बैलजोडीचा मृत्यू झाला आहे. शेजारील गिरगाव येथे एका दुकानावर झाड पडून मोठे आर्थिक नुकसान झाले. बागलाण तालुक्यातील डांगसौंदाने, विरगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. केरसाने येथील मुख्य रस्त्यावरील सुरेश माळी या शेतकऱ्याच्या शेतात झाडाखाली बांधलेले दोन बैल वीज पडल्याने मृत्युमुखी पडल्याने हजारांचे नुकसान झाले. महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. वीरगाव येथील राजेंद्र देवरे यांच्या दुकानावर झाड कोसळले दुकान जमीन जमीनदोस्त झाले.
जिल्ह्यातील एकूण नुकसान (कालपर्यंत )
नाशिक जिल्ह्यात कालपर्यंत वीज पडून ठार चार नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये सिन्नर, नांदगाव, देवळाली कॅम्प, कळवण तालुक्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. तर अकरा जनावरे दगावली आहेत. असेच ९३ घरांची पडझड, १७ कांदा चाळीचे नुकसान, ०२ पोल्ट्री, ०२ शेडनेटचे नुकसान झाले आहे.