CM Eknath Shinde Malegaon : मालेगाव जिल्हानिर्मिती संदर्भात मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, भरसभेत म्हणाले...
CM Eknath Shinde Malegaon : मालेगाव जिल्हा (Malegaon District) निर्मितीबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच मुंबईत (Mumbai) बैठक घेऊ असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले.
CM Eknath Shinde Malegaon : मालेगाव जिल्हा (Malegaon District) विषय अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, जुनी मागणी आहे. याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच मुंबईत बैठक घेऊन याबाबत भूमिका मांडू असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना मालेगाव येथे विविध कार्यक्रमांचे उदघाटन यावेळी करण्यात आले. पोलीस वसाहत, पोलीस स्टेशन आदींसह इतर भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मालेगाव जिल्हयाबाबत भूमिक स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले कि, मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मालेगाव मध्यचे आमदार दादा भुसे, सुहास कांदे व इतर आमदारांनी केली आहे. जिल्हा केल्यानंतर लोकांच्या सोयीकरता प्रस्ताव करावे लागतात.
पुढे ते म्हणाले कि, याबाबत अनेक आमदारही सकारात्मक आहेत, तर काही तालुक्यांचा विरोध आहे. तसेच चांदवडचे राहुल आहेर यांनी देखील सूचना केली आहे. दरम्यान मालेगाव जिल्ह्याबाबत कार्यान्वयीत पद्धतीने मुंबईत साधक-बाधक चर्चा होईल. त्याच्यामध्ये फायदे तोटे याबाबत विचार करण्यात येणार आहे. याबाबत सरकार सकारात्मक असून मालेगावचा विषय सकारात्मक दृष्टिकोनातून लवकरच मार्गी लावू. त्यासाठी लवकरच मुंबईत बैठक लवकर घेत आहोत, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
भर सभेत म्हणाले...
मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत लवकरच निर्णय घेऊ सकाळी आम्ही उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोललो. ते याबाबत सकारात्मक असून आम्ही लवकरच याबाबत वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले कि, मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मालेगाव मध्यचे आमदार दादा भुसे, सुहास कांदे व इतर आमदारांनी केली आहे. जिल्हा केल्यानंतर लोकांच्या सोयीकरता प्रस्ताव करावे लागतात.
राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही!
राजपालांचे वैयक्तिक विधान असून मुंबईसाठी मराठी माणसाच विधान कोणीही नाकारू शकत नाही. 106 हुतत्म्यामुळे मुंबई मिळाली त्या सर्वाच योगदान विसरता येणार नाही. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मराठी माणसाचे त्याग योगदान कुणालाही अवमान करता येणार आहे. मराठी माणसाचे योगदान कुणालाही नाकारता येणार आहे. इतर राज्यातील लोक रोजगार करतात, व्यवसाय व्यापार करतात, मुंबईचे श्रेय कोणालाही घेता येणार नाही. मुंबई अनेक प्रसंग आले, अनेक संकट पहिली, शिवसेना प्रमुख श्वेतापर्यंत सोबत थांबले पोटापाण्याच्या प्रश्न मुंबई सोडवते. शिवसेना म्हणून आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही. राज्यपालांच्या विषय फार बोलायचं नाही, बाळासाहेबांची भूमिका तीच आमची भूमिका आहे.
पोलिसांना 205 घरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव मध्ये पोलीस वसाहतीचे उदघाटन केले. यामध्ये 205 पोलिसांना या माध्यमातून घरे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व सामान्य लोकांना न्याय दिल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे योजना असतील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्या चा प्रयत्न अशा प्रकारच्या बैठकांमधून करणार आहोत. अतिशय उत्तम दर्जाची गरज त्या ठिकाणी बांधलेली आम्ही पाहिलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात पोलीस वसाहतीचा प्रश्न मोठा असून याबाबत उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली आहे. मुंबईत देखील पोलिसांना मोठ्या प्रमाणावर घरे आवश्यक आहे. राज्यभरामध्ये पोलिसांच्या मनुष्यबळाप्रमाणे घरांची निर्मिती झाली पाहिजे, आपणा सर्वांच्या सहकार्याने प्रश्न सोडवणार आहोत.