एक्स्प्लोर

Nashik News : आवडत्या श्वानाचं निधन झालं, सगळा गाव हळहळला! गावात बांधणार स्मारक

Nashik News : नाशिक तालुक्यातील पळसे (Palse Village) या गावात आवडत्या बाराशे नावाच्या श्वानाचे (Dog) निधन झाल्याने गावात स्मारक (Dog Memorial) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 

Nashik News : श्वान म्हटलं कि आजही या श्वानाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. आपल्या मालकाविषयीची कृतज्ञता व्यक्त जीवाची बाजी लावून श्वान आपले काम करतात. अशीच एक घटना नाशिकच्या (Nashik) पळसे गावात घडली आहे. हि घटना वाचल्यानंतर जॅकी श्राफच्या (Jacky Shraf) 'तेरी मेहरबानिया' या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. 

नाशिक तालुक्यातील पळसे (Palse Village) या गावात काही वर्षांपूर्वी आलेल्या बाराशे नावाच्या कुत्र्याचे निधन झाले. बाराशेच्या निधनाची बातमी कळताच सगळ्या गावकऱ्यांनी टाहो फोडला. यावेळी अंत्यविधीला सगळा गाव जमा झाला. शेवटी विधिवत या बाराशे नावाच्या श्वानाचे अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी गावात श्वानाचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या पळसे गावात बाराशे नामक श्वानाचे पिल्लू गावात आले. येथील गावकऱ्यांमध्ये ते रुळू लागले. हळूहळू सगळ्या गावाच्या ओळखीचा हा श्वान झाला. मग गावातील कोणत्याही कार्यक्रमात हा श्वान सहभागी होत असे. किंवा गावात एखाद्या नागरिकांचे निधन झाले, कि अंत्यविधी असो दशक्रिया विधी सगळ्या कार्यक्रमांना हा श्वान उपस्थित असायचा. तसेच गावातील हरीनाम सप्ताहातील कार्यक्रमास तो नित्यनियमाने हजेरी लावायचा, कुणाच्याही दारी दिवसा तो हक्काने दिसत असे. त्याला कुणाच्याही घरी मुक्त प्रवेश करत असे. एकूणच गावातील प्रत्येकाच्या गळ्यातील बाराशे हा ताईतच झाला होता. 

अशातच बाराशे या श्वानाचे निधन झाल्याची वार्ता गावभर पसरली. यावेळी पळसे गावातील नागरिक हळहळले, अनेकांनी टाहो फोडला. गावकर्यांनी एकत्र येत त्याच्या अंत्यविधीची तयारी करत अंत्ययात्रा  मिरवणूक काढुन अंत्यविधी केला. यावेळी बाराशेच्या अंत्यविधीला लेखक उत्तमराव कांबळे देखील उपस्थित असल्याचे गावकर्यांनी सांगितले. 

बाराशेचे स्मारक बांधणार 
दरम्यान गेल्या काही वर्षांपासून पळसे वासियांना बाराशेचं लळा लागला होता. मात्र बाराशेच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. अंत्यविधीनंतर ग्रामस्थांनी एकत्र येत बाराशेचे स्मारक बांधण्याचा निर्णय शोकसभेत घेण्यात आला आहे. पुढील पिढीला माणुसकी आणि श्वानाचे प्रेम याबाबत सामाजिक संदेश जावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

असे पडले बाराशे नाव 
श्वानाचे हे पिल्लू चार वर्षाचे असताना रस्त्याच्या कडे उभे होते. यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाले होते. त्यावेळी पळसे येथील काही नागरिकांनी त्याला पशवैद्यकीय दवाखान्यात नेले होते. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्यांनतर औदोपहकराचा खर्च बाराशे रुपये झाला होता, म्हणून त्याचे नाव बाराशे पडले आणि तेच पुढे प्रसिद्ध झाले, असे येथील नागरिक सांगतात. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget