Nashik CNG Rate : नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात तीन रुपयांनी कपात, सीएनजी वाहनधारक समाधानी
Nashik CNG Rate : नाशिकमध्ये (Nashik) देखील सीएनजीच्या (CNG Rate) किमती तीन रुपये 40 पैशांनी कपात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड म्हणजे एमएनजीएल (MGNL) कंपनीने दिली आह.
Nashik CNG Rate : राज्यातील अनेक शहरात सीएनजीच्या (CNG Rate) दरात कपात करण्यात आली असून नाशिकमध्ये (Nashik) देखील सीएनजीच्या किमती तीन रुपये 40 पैशांनी कपात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड म्हणजे एमएनजीएल (MGNL) कंपनीने दिली आहे. बुधवारपासून हे दर लागू झाले असून आता सीएनजी साठी प्रति किलोला वाहनधारकांना 92 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत.
गेल्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले होते. यामुळे सीएनजी वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे पेट्रोलच्या किमती वाढल्याने वाहनधारकांनी सीएनजी वाहनांचा पर्याय निवडला. परंतु मागील काही महिन्यात यांच्या किमती इतक्या वाढल्या की त्या पेट्रोल आणि डिझेलच्या पातळीवर गेल्याची वाहनधारकांची सांगितले सीएनजीची दरवाढ वाहनधारकांची आर्थिक समीकरण विस्कळीत करणारी ठरत आहे. दुसरीकडे शहरात सीएनजी वाहने वाढत असताना पुरेशा प्रमाणात गॅसची उपलब्धता होत नाही. सीएनजी घेण्यासाठी भल्या सकाळपासून पंपावर वाहनांच्या रांगा लागतात. गॅस संपुष्टात आल्यावर रांगेतील वाहनधारकांना माघारी फिरावे लागते.
नाशिकमध्ये (Nashik) अलीकडच्या काळात सीएनजीच वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र सीएनजी वाहनांच्या संख्येच्या तुलनेत सीएनजी पंप कमी आहे. वाढत्या किमती व सीएनजी मिळवतानाची दमछाक यामुळे वाहनधारक त्रस्तावले आहे. या स्थितीत सीएनजीचे दर प्रतिकिलोला तीन रुपये 40 पैशानी कमी झाल्यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. एमएनजीएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्रीपासून दि दरकपात करण्यात आली आहे. सीएनजीची किंमत प्रतिकिलो ग्रामला तीन रुपये 40 पैशांनी कमी झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. सीएनजीची 95 रुपये 90 पैसे प्रतिकिलो इतकी कमी झाली आहे. या दरकपातीमुळे सीएनजी दर पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत प्रवासी चारचाकी वाहनासाठी अनुक्रमे सुमारे 47 टक्के आणि 24 टक्क्यांची बचत होईल असा दावा कंपनीने केला आहे. घरगुती नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्याने सीएनजीच्या दरात ही कपात करण्यात आली.
नाशिकचे पेट्रोल डीझेल दर
दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी शिंदे सरकारने पेट्रोल डीझेल वाहनधारकांना चांगला दिलासा दिला. पेट्रोलमध्ये व डिझेलदरामध्ये कपात केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. आज नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.77 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.27 रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात हाच दर असून वाहनधाकरकांमध्ये सध्यातरी समाधान आहे.