Bhusawal Igatpuri Memu : चाकरमान्यांची होणार धावपळ, भुसावळ-इगतपुरी मेमू ट्रेन नाशिक स्टेशनपर्यंतच धावणार!
Bhusawal Igatpuri Memu : भुसावळ ते इगतपुरी स्टेशन (Igatpuri Station) दरम्यान धावणारी मेमू गाडी (Memu Railway) पुढील आठवड्यात ४ दिवस नाशिक स्टेशनपर्यंतच (Nashik Road Railway Station) धावणार आहे.
Bhusawal Igatpuri Memu : चाकरमान्यांसाठी सोयीची ठरत असलेली भुसावळ ते इगतपुरी स्टेशन दरम्यान धावणारी मेमू गाडी पुढील आठवड्यात चार दिवस इगतपुरी न जाता फक्त नाशिक रोड (Nashik) स्टेशनपर्यंतच धावणार आहे. यामुळे प्रवाशाची गैरसोय होणार आहे.
कोरोनामुळे बंद झालेल्या भुसावळ - देवळाली शटल सेवा बंद करण्यात आली होती. या मार्गावरील अनेक लहानसहान गावांना जोडणारी गाडी दररोज हजारो प्रवाशांसाठी सोयीस्कर होती. मात्र यावर पर्याय म्हणून जानेवारीपासून भुसावळ ते इगतपुरी दरम्यान मेमू ट्रेन सुरु करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा चाकरमान्यांची सोया झाली. पण आता पुन्हा हि मेमू काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
भुसावळ देवळाली या रेल्वे गाडीला पर्याय म्हणून तसेच चाकरमान्यांच्या मागणीवर भुसावळ रेल्वे प्रशासनाने हि मेमू ट्रेन सुरु केली होती. इगतपुरी रेल्वे यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे 28 मे ते 01 जून या दरम्यान तांत्रिक काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ही गाडी नाशिकपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. सदर मेमू गाडी ही नेहमीच्याच वेळेवर सुटेल. मात्र चार दिवस प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
भुसावळ ते इगतपुरी स्टेशन दरम्यान धावणारी मेमू गाडी पुढील आठवड्यात 04 दिवस इगतपुरी न जाता, नाशिक स्टेशनपर्यंतच धावणार आहे. इगतपुरी रेल्वे यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सादर मार्गावर दुरुस्तीचे काम आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भुसावळ ते इगतपुरी स्टेशन दरम्यान धावणारी मेमू गाडी पुढील आठवड्यात 04 दिवस इगतपुरी न जाता, नाशिक स्टेशनपर्यंतच धावणार आहे. इगतपुरी रेल्वे यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे 28 मे ते 01 जून या दरम्यान तांत्रिक काम हाती घेण्यात येणार आहे.
चाकरमान्यांची गैरसोय
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सुरु झालेल्या मेमू एक्सप्रेसमुळे हजारो चाकरमानी ये जा करीत होते. मात्र आता अचानकपणे 28 मे ते 01 जूनपर्यंत तांत्रिक काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे चार दिवस प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. या तांत्रिक कामामुळे मनमाडहून मुंबईकडे जाणारी एक्स्प्रेस उशिराने धावू शकतात; असा अंदाज व्यक्त केला जात आहे.