Nashik News : नाशिक जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर बंदी, जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांचे आदेश
Nashik News : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी (Nashik Collector) कडक पाऊले उचलत संबंधित तहसीलदारांना (Tahsildar) इशारा देत पर्यटन स्थळावर (Tourist Place) बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
Nashik News : दुगारवाडी (Dugarwadi) येथे झालेल्या दुर्घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी (Nashik Collector) कडक पाऊले उचलत संबंधित तहसीलदारांना इशारा देत पर्यटन स्थळावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर (Nashik Tourist Place) पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे.
दरम्यान नाशिकसह (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर रविवार असल्याने त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटकांची आलोतर गर्दी होती. यामध्ये सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे दुगारवाडी धबधबा ओसंडून वाहत होता. यावेळी रविवारच्या सुट्टीच्या निमित्तानं धबधबा पाहण्यासाठी आलेले पर्यटक अडकले. मुसळधार पाऊस, अचानक वाढलेली पाण्याची पातळी आणि अंधार यांमुळे पर्यटक अडकले होते. पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर बचावकार्य सुरु झाले. रात्री उशिरा 17 पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. मात्र यात एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला आज दुपारच्या सुमारास संबंधित व्यक्तीचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती लागल्याची माहिती गंगाथरण डी यांनी दिली.
दरम्यान दुगारवाडीसह त्र्यंबकेश्वर परिसरतील ब्रम्हगिरी, पहिने आदी परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र जीवाची कोणतीही काळजी न करता जीव धोक्यात घालून पर्यटन करीत असतात. त्याचाच प्रत्यय दुगारवाडीत आला. त्यामुळे या सर्वावर निर्बंध म्हणून जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात येत आहे. याबाबतच्या सूचना संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील धोकादायक पर्यटक तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी न जाण्याचा इशारा देखील यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन यांनी दिला
नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
दरम्यान पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर उद्या 09 ऑगस्ट रोजी नाशिकच्या घाटमाथा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भागात तुरळक ते घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान काल सायंकाळी नाशिक शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे तीन तासांत 34 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मात्र सकाळपासून शहर परिसरात उघडीप दिली आहे.