Nashik Job Majha : कामाच्या शोधात आहात? नाशिक जिल्ह्यात होतोय रोजगार मेळावा, असा करा अर्ज
Nashik Job Majha : नाशिक (Nashik) जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा (Online Rojgar Melava) आयोजन केला आहे.
Nashik Job Majha : नाशिक (Nashik) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्यामार्फत दि. 25 ते 28 जुलै 2022 दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ऑनलाईन पध्दतीने 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा' (Rojgar Melava) आयोजन करण्यात आला आहे. या जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा (Online Rojgar Melava) आयोजन केला असून यामधील मुलाखती मोबाईल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक व पुणे (Pune) जिल्हयातील आस्थापना महिंद्रा अँड महिंद्रा लि., नाशिक प्लांट, पदे- अप्रेंटिसशिप आणि ईपीपी ट्रेनीशिप, एसएससी इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर मॅकेनिक मोटर व्हेईकल -50, एकूण पदे-50, डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लि. नाशिक, पदे- ऑपरेटर, पद-100, एकूण पदे-100, मोंक ऑटोमेशन प्रा.लि. अंबड, नाशिक, पद- प्रोजेक्ट मॅनेजर -04, एकूण पदे-04, तिरुमला इंडस्ट्रीयल & एलाईड सर्व्हिसेस, प्रा.लि., पुणे पदे- डिप्लोमा -50, एकूण पदे -50, स्लाईडवेल माईलर टेक्नोलॉजी प्रा.लि., पदे- CO2 वेल्डर -20 एकूण पदे - 20, तालेंसेतु सर्व्हिसेस प्रा.लि. पुणे, पदे- असेंबली लाईन ऑपरेटर, 20, पदे- मशिन ऑपरेटर-20, एकूण पदे- 40, एकूण पदे-40, एसएमपी ऑटो टेक, पदे-ट्रेनी सीएनसी ऑपरेटर-20, एकूण-20 अशी एकूण - 284 रिक्तपदे ऑनलाईन प्राप्त झाली आहेत. या मेळाव्यासाठी वरील 7 नामांकित आस्थापनांची पदे प्राप्त झाली असून सदर आस्थापनांचे नियुक्ती अधिकारी ऑनलाईन (Skype, Whatsapp) तसेच मोबाईल / दूरध्वनीव्दारे पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड करणार आहेत.
दरम्यान आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये 8 वी पास, एसएससी एचएससी, इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, वायरमन, मॅकेनिक मोटर व्हेईकल, सीएनसी ऑपरेटर, डिप्लोमा , ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, बी.ई./बी.टेक 12 महिने अनुभवासह, डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल रिलेटेड, केमेस्ट्री, वेल्डर, गॅस वेल्डर, गॅस व इलेक्ट्रीक वेल्डर 6 महिने अनुभव सह, डिप्लोमा इन इंजिनियरींग, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, मशिनिष्ट आवश्यक सर्टिफीकेटसह इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे.
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar. mahaswayam .gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर Clik करुन 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' निमित्त आयोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” NASHIK ONLINE JOB FAIR-4 (2022-23) या मध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. काही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक 0253 -2993321 वर संपर्क करावा आणि या मेळाव्याच्या ऑनलाईन मुलाखती देऊन लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती अ.ला.तडवी, सहायक आयुक्त, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांनी केले आहे.