Nashik News : ओबीसी इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची पद्धत चुकीची, नाशिकमध्ये समता परिषदेकडून आंदोलन
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने बाठिया आयोगाच्या ओबीसी (OBC) इम्पेरिकल डाटा गोळा करण्याच्या पद्धतीचा निषेध करण्यात आला आहे.
Nashik News : नाशिकमध्ये आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने घोषणाबाजी करण्यात येऊन बाठिया आयोगाच्या ओबीसी इम्पेरिकल डाटा गोळा करण्याच्या पद्धतीचा निषेध करण्यात आला आहे.
राज्यात ओबीसींचा इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी समर्पित आयोगाची नेमणूक करण्यात आलेली आहे. या ओबीसी आयोगाच्या वतीने शासकीय कार्यालयातून डेटा गोळा करण्यात येत आहे. मात्र काही कार्यालयातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केवळ आडनावावरून ओबीसींचा डेटा गोळा करण्यात येत आहे. आडनावावरून ओबीसींचा डेटा गोळा केला तर ओबीसींची खरी आकडेवारी समोर येऊ शकणार नाही. त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने यास विरोध केला असून या पार्श्वभूमीवर आंदोलन केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने यांनी यावेळी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत स्थरावर निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ओबीसींचा डेटा हा गाव पातळीवर ग्रामपंचायत स्तरावर तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील तसेच शहर पातळीवर नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक्ष यंत्रणेकडून डेटा गोळा करणे अपेक्षित आहे. मात्र काही यंत्रणेकडून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केवळ आडनावाच्या माध्यमातून डेटा गोळा केला जात आहे.
ओबीसींचा परिपुर्ण डेटा गोळा होणार नाही.
ओबीसींचा डेटा हा गाव पातळीवर ग्रामपंचायत स्तरावर तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील तसेच शहर पातळीवर नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक्ष यंत्रणेकडून डेटा गोळा करणे अपेक्षित आहे. मात्र काही यंत्रणेकडून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केवळ आडनावाच्या माध्यमातून डेटा गोळा केला जात आहे. ओबीसींचा परिपुर्ण डेटा गोळा होणार नाही. हा ओबीसींवर होणार मोठा अन्याय आहे. त्यामुळे याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी महानगरपालिका, तालुका पातळीवर पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका व ग्रामपालिका, ग्रामपंचायत स्थरावर निदर्शने करण्यात आली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.