(Source: Poll of Polls)
Nashik News : नाशिकच्या ध्वजारोहण सोहळ्यातच आंदोलनकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी घेतलं ताब्यात
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) ध्वजारोहण सोहळ्यातच आंदोलनकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
नाशिक : आज देशभरात स्वातंत्र्यदिन (Independence Day) उत्साहात साजरा करण्यात येत असून नाशिकमध्ये (Nashik) देखील उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांसह विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले आहे. अशातच एका आंदोलनकर्त्याने आत्मदहन (Self-Immolation) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र वेळीच पोलिसांनी प्रसंगावधान राखत आंदोलन कर्त्याला ताब्यात घेतले आहे.
नाशिकमधून (Nashik) महत्वाची बातमी समोर येत असून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा देणाऱ्या आंदोलनकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भुमिअभिलेखच्या चुकीच्या कारभारामुळे वडिलोपार्जित क्षेत्र गमावल्याचा आरोप करत चांदवड तालुक्यातील योगेश खताळ यांचे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर (Nashik divisional Office) 40 दिवसापासून आंदोलन सुरू होते. आज स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा दिला इशारा होता. दरम्यान आत्मदहन करण्यासाठी पेट्रोल घेऊन येताच पोलिसांनी ताब्यात घेतले.
भुमिअभिलेखच्या चुकीच्या कारभारामुळे वडिलोपार्जित क्षेत्र गमावल्याचा आरोप करत चांदवड तालुक्यातील योगेश खताळ यांचे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी प्रसंगावधान राखत त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. योगेश खताळ असे त्या तरुणाचे नाव आहे. तो चांदवड तालुक्यातील रहिवासी असून गेल्या चाळीस दिवसांपासून भूमी अभिलेखच्या कारभारामुळे जमीन गेल्याच्या प्रकरणातून तो आंदोलन करत होता. त्यासाठी उपोषण आंदोलनदेखील केले आहे; मात्र याची दखल कोणीच घेतली नाही, म्हणून योगेश खताळ याने स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यलयाबाहेर असताना त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी त्यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :