MPSC उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विजयी जल्लोष; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Nashik News : MPSC उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विजयी जल्लोष शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
Maharashtra Nashik News : कोरोनामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला. तसेच, सर्वात मोठा परिणाम झालेल्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र म्हणजे, शिक्षण क्षेत्र. शाळा, कॉलेज बंद झाल्या. ऑनलाईन वर्ग भरु लागले. इतकंच नाहीतर, स्पर्धा परीक्षांवरही मोठा परिणाम झाला. दोन वर्षांत परीक्षांच्या तारखांवर तारखा जाहीर झाल्या. मात्र परीक्षा काही झाल्याचं नाहीत. एवढंच नाहीतर झालेल्या परीक्षांचे निकालही रखडले. अशातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2019 मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षांचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आणि उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला. सध्या या निकालात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विजयी जल्लोष संपूर्ण शहरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरतोय.
MPSC उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विजयी जल्लोष शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2019 मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षांचा अंतिम निकाल नुकताच लागला. यात यशस्वी झालेल्या भावी फौजदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ढोल ताशावर ठेका धरला. एवढंच नव्हे तर गुलाल उधळत एकच जल्लोष साजरा केला. उत्तीर्ण उमेदवार आणि त्याच्या मित्रमंडळींनी एकच जल्लोष साजरा केला.
एखाद्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे समर्थक गळ्यात हार घालून, विजयी उमेदवारांना खांद्यावर घेऊन, वादकांना ज्या प्रमाणे पैशाची बक्षिसी देतात. अगदी त्याच पद्धतीनं या भावी फौजदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. भविष्यात कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर येणार, त्यांनीच विना परवानगी गुलालाची उधळण करत रस्त्यावर आनंदोत्सव साजरा केला. आपल्या अतिउत्साहानं वाहतुकीलाही अडथळा होत असल्याचंही त्यांना भान राहिलं नाही, शनिवारी दुपारी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंडित कॅलिनी परिसरातील जल्लोषाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे नियमांवर बोट ठेवणारे पोलीस आयुक्त काय करावाई करतायत याकडे लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Online Games : ऑनलाइन गेम्समधून होणाऱ्या फसवणुकीला बसणार चाप! राज्य सरकारकडून लवकरच कायद्यात मोठे बदल?
- तुमची मुलं ऑनलाईन गेम्स खेळतायत? हॅकर्सने लुटले सव्वा तीन लाख रुपये, गेमिंगद्वारे फसवणूक
- FIR filed against Vaibhav Gehlot: राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, फसवणूक केल्याचा आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha