Nashik News : नाशिकमध्ये माथेरानचा फिल! शहरात 8.4 अंश सेल्सिअस तापमान, निफाड 6.3 अंशावर
Nashik News : नाशिकचा पारा घसरून 8.4 अंशावर पोहचला आहे तर निफाडचा पारा आज 6.3 अंशावर आहे.
![Nashik News : नाशिकमध्ये माथेरानचा फिल! शहरात 8.4 अंश सेल्सिअस तापमान, निफाड 6.3 अंशावर maharashtra nashik news Temperature in Nashik at 8.4 degrees, mercury in Niphad at 6.3 degrees Nashik News : नाशिकमध्ये माथेरानचा फिल! शहरात 8.4 अंश सेल्सिअस तापमान, निफाड 6.3 अंशावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/6a607523338aa16f758575a66448627a1673762281166441_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील थंडीचा पारा (Temprature) दिवसेंदिवस घसरत आहे. आज पुन्हा नाशिकच्या तापमानात घट होऊन पारा घसरला आहे. तर नाशिक कॅलिफोर्नियात आज सहा अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज नाशिक शहरात 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची (Cold) नोंद करण्यात आली तर निफाडमध्ये आज 6.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.
नववर्षाच्या सुरवातीपासूनच नाशिक शहरासह जिल्ह्यात कमालीची थंडी असून दिवसभर हवेत गारवा असल्याने प्रचंड थंडी जाणवत आहे. त्यामुळे घराबाहेर निघणे कठीण होऊन बसले आहे. जवळपास आठवडाभरापासून पारा खाली जात असल्याने नाशिकसह जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून मागील काही दिवसांपासून हुडहुडीने वेढा घातला आहे. ढगाळ वातावरणाने काढता पाय घेतल्यानंतर आता थंडीचे आगमन झाले असून किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही घसरण झाली आहे. तर सकाळच्या सुमारास थंड वाऱ्यांमुळे दिवसाही नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत घरातून बाहेर निघणे कठीण झाले आहे.
नाशिकमध्ये काल 8.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली तर पारा घसरून 8.4 अंशावर पोहचला आहे. तर जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला सातत्याने निचांकी तापमानाची नोंद करण्यात येत आहे. मागील आठवड्यात सलग दोन दिवस 5 अंशावर पारा जैसे थे होता. दरम्यान थंडीची सुरुवात झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात बोचरा थंडीचा अनुभव नाशिककरांनी घेतला. मात्र जानेवारीचा पाहील आठवडा सरल्यानंतर कमाल तापमानात मात्र घसरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासून ते दिवसभर हवेत गारवा असल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. सकाळी आठ वाजेला निघणारे नोकरदार वर्गही नऊ वाजेला घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सकाळपासून घातलेला स्वेटर दिवसभरही परिधान करावा लागत आहे.
मागील आठवडाभर हुडहुडी कायम...
मागील सोमवारी नाशिक शहर 8.7, मंगळवारी 7.6, बुधवारी 9.0, गुरुवारी 9.2, शुक्रवारी 13.0, शनिवारी 8.8, तर रविवारी हेच तापमान 8.4 अंशावर पोहचले आहे. तर दुसरीकडे निफाडचा पारा देखील घसरत असून मागील आठवड्यात सलग दोन दिवस 5 अंशावर पारा थांबला होता. तर आज निफाचं कुंदेवाडी गहू केंद्रात 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर नाशिक 8.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हवेत गारवा असल्याने प्रचंड थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)