Nashik Shivjayanti : नाशिकच्या शिवजयंतीच खास आकर्षण, 61 फूट शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा, तर 21 फूट कवड्यांची माळ
Nashik Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीनिमित्त नाशिक शहर भगवेमय झाले असून शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
Nashik Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) नाशिक शहर (Nashik News) भगवंमय झाले असून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मोत्सव सोहळ्यासाठी ठिकठिकाणी शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नाशिक शहरातलं भव्य आकर्षण म्हणजे, 61 फूट शिवरायांची मूर्ती त्याचबरोबर 21 फूट कवड्यांची माळ लक्ष वेधून घेत आहे.
नाशिक (Nashik) शहरात शिवजयंतीचा उत्सव शिगेला पोहोचला असून चौकाचौकांमध्ये उभारण्यात आलेले भव्य स्टेज, शिवचरित्रावर आधारित देखावे, तर कुठे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम, त्याचबरोबर पोवाडे, शिवगितांचे गायन आधी उपक्रमांच्या आयोजनासह शहर शिवजन्मोत्सवासाठी सजल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, शिवजयंतीनिमित्त शहरांतील अशोकस्तंभ या परिसरात 61 फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा नाशिककरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. पुतळ्याची उभारणी अशोकस्तंभ मित्र मंडळाकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे छत्रपती सेनेच्या वतीने दरवर्षी करण्यात येणाऱ्या विश्वविक्रमामध्ये यंदा 21 फूट कवड्याची माळ साकारण्यात आली आहे.
दरम्यान, शहरातील अशोकस्तंभ मित्रमंडळाने 61 फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची रूंदी 22 फुट तर वजन तब्बल 3 हजार किलो आहे. हा पुतळा बनवण्यासाठी 12 दिवसांचा कालावधी लागला आहे. अशोकस्तंभ येथे पुतळा 3 मोठ्या क्रेनच्या मदतीने दोन भागात हा पुतळा उभारण्यात आला. दीड महिन्यांपूर्वी पुतळा बनवण्यास त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एच. पी. ब्रदर्स आर्टसच्या हितेश आणि हेमंत पाटोळे यांनी सुरुवात केली होती. मात्र दुर्देवाने पुतळ्याचे थोडेच रंगकाम बाकी असताना शॉर्टसर्किंटमुळे लागलेल्या आगीत पुतळ्याची हानी झाली. त्यानंतर बारा दिवसात पुन्हा नवीन पुतळा बनवण्यात आला.
भव्य कवड्यांची माळ
नाशिक छत्रपती सेनेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात आदर्श शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. यंदाही शिवजन्माेत्सवाला नाशिककरांना 21 फूट लांबीची, 71 किलाे वजनाची, 64 कवड्यांची माळ साकारण्यात आली आहे. शिवजयंतीचे औचित्य साधत छत्रपती सेनेने 21 फूट लांबीची कवड्याची माळ साकारली आहे. या उपक्रमाची वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आले असून उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. यंदा कवड्याची माळ साकारली आली असून विश्वविक्रमात नोंद होण्यासाठी सेनेकडून माळेची नोंदणी करण्यात आल्याची माहिती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी दिली आहे. या 21 फुटी माळेत 64 कवड्यांचा वापर करण्यात आला असून कवडीची उंची 1.25 फूट आहे. तर वजन 71 किलो आहे. यापूर्वी छत्रपती सेनेने 13 फुटांची भवानी तलवार आणि जिरे टोप सहा फुट उंच शिवरायांचा टाक वागण्याच्या कट्यार साकारली होती.
शिवप्रेमींची सेल्फीसाठी गर्दी
दरम्यान शिवजयंतीचा उत्साह मोठ्या परमानावर असून ठिकठिकाणी वेगवगेळ्या प्रकारए देखावे उभारण्यात आले आहे. नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा नाशिककरासाठी आकर्षण ठरत आहे. तर दुसरीकडे सीबीएस जावळी छत्रपती शिवाजी स्मारकात 21 फुटी कवड्याची माळही लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणासह इतर ठिकाणी देखावे पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.