Nashik ZP Bharati : नाशिक जिल्हा परिषदेत काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल 1038 पदांची भरती, संपूर्ण वेळापत्रक वाचा एका क्लिकवर
Nashik ZP Bharati : नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेतील तब्बल 1038 रिक्त पदांची मेगा भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Nashik ZP Bharati : राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगा भरतीची (Mega Bharati) घोषणा करण्यात आली आहे. त्यानुषंगाने नाशिक जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये 20 संवर्गातील तब्बल 1038 पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असून यासंदर्भातील जाहिरात ही नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यातील 34 जिल्हा परिषद अंतर्गत (Maharashtra ZP Bharati 2023) आरोग्य विभागातील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे (गट क) सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. एकूण 30 संवर्गातील 19 हजार 460 पदे भरण्याची जाहिरात 5 ऑगस्ट रोजीच प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली. मार्च 2019 मध्ये गट-क मधील 18 संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र निवडणूक आचारसंहिता, कोरोना (Corona) व इतर कारणांमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागवले जातील. संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर हे अर्ज भरावे लागतील. शक्यतो एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा घेतल्या जातील. त्यामुळे उमेदवारांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरळसेवेने भरावयाच्या पदाकरीता https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP Bharati) संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. ऑनलाईन भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचून ऑनलाईन (Online) पद्धतीनेच संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.
वयोमर्यादेत 2 वर्षे शिथिलता
ज्या उमेदवारांनी मार्च 2019 मध्ये अर्ज केला होता, मात्र आता ज्यांनी कमाल वयाची मर्यादा ओलांडली आहे असे उमेदवार 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा परिषदेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व पदांसाठी पात्र ठरतील. तसेच ज्या उमेदवारांनी मार्च 2019 मध्ये अर्ज केलेला नाही त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयास अनुसरून कमाल वयोमर्यादेत 2 वर्षे शिथिलता देण्यात आली आहे. तेही 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता पात्र असतील.
ही पदे भरली जाणार
(कंत्राटी) ग्रामसेवक – 50, आरोग्य पर्यवेक्षक – 3, आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] – 597, आरोग्य सेवक (पुरुष) 40% - 85, आरोग्य सेवक (पुरुष) 50%– 126, औषध निर्माण अधिकारी – 20, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 14, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – 2, विस्तार अधिकारी(शिक्षण) (वर्ग ३ श्रेणी २) – 7, वरिष्ठ सहाय्यक – 3, पशुधन पर्यवेक्षक – 28, कनिष्ठ आरेखक – 2, कनिष्ठ लेखा अधिकारी – 1, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – 5, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) – 22, मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका – 4, कनिष्ठ यांत्रिकी – 1, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा पु.) – 34, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य ) इवद – 33 लघुलेखक (उच्च श्रेणी) – 1 अशा एकूण 1038 जागा नाशिक जिल्ह्याकरिता आहेत.
इतर संबंधित बातम्या :
Maharashtra ZP Bharti : राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील पदांची भरती