(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Leopard : सिन्नरला शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, पण शेतकऱ्याने झुंज दिली, अन् बिबट्याला पळवून लावलं
Nashik News : सिन्नर तालुक्यातील नायगाव परिसरात तरुण शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Nashik Leopard News : सिन्नर (Sinnar) तालुक्यातील सोमठाणे भागात सतरा वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला (leopard Attack) केल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील नायगाव परिसरात तरुण शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. नाशिकमध्ये सातत्याने होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.
नाशिकच्या (Nashik) आजूबाजूचा परिसरात बिबट्याचा अधिवास असल्याचे वेळोवेळी अधोरेखित होत आहे. अनेकदा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने पिंजरे लावून बिबट्यांना रेस्क्यू केले जात आहे. रात्रीच्या वेळी शेतातील वस्तीतून गावात दुचाकीने जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालून हल्ला केला. मात्र शेतकऱ्यांने दुचाकीची तुटलेली कीकचा बिबट्याच्या (Leopard) डोक्यावर प्रहार करत त्याला पळवून लावले. विष्णू बाळासाहेब तुपे असे शेतकऱ्याचे नाव असून ते या हल्ल्यात जखमी झाले आहेत. नायगाव येथे गंगाघाट परिसरातील कातकडे मळ्यात शनिवार रात्री पावणे आठ वाजता ही घटना घडली.
शनिवारी नायगाव (Naigaon) येथील बाजार असल्याने ते दुचाकीने रात्री शेतातील वस्ती होऊन गावात जात असताना कातकडे मळा येथे उसात दडून बसलेल्या बिबट्याने तुपे यांच्यावर झडप घातली. यामुळे तुपे दुचाकी सह खाली पडले. यावेळी दुचाकी खाली पडल्याने जमिनीवर तुटून पडलेली दुचाकीची कीक ऐनवेळी त्यांच्या हाती लागली. तोपर्यंत बिबट्याने तुपे यांच्यावर हल्ला करत जमिनीवर लोळवले. परंतु याही परिस्थितीत तुपे यांनी तिच्या सहाय्याने अंधारातच बिबट्याच्या डोक्यात जबड्यावर एका मागेमागे प्रहार केले. या माऱ्यामुळे भांबावलेल्या बिबट्याने तुपे यांना सोडून उसाच्या पिकात धूम ठोकली. बिबट्या पळून जाताच तुपे जखमी अवस्थेत अर्धा किलोमीटर मागे घरी परतले. या घटनेची माहिती मिळताच जवळच वस्तीवर राहणारे दिगंबर कातकडे यांनी तुपे यांना नायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तुपे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वनविभागाकडून जनजागृती मोहीम
दरम्यान नाशिकसह परिसरात बिबट्याचे दर्शनासह हल्ल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे वनविभागाकडून देखील नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील वनविभागाकडून केले जाते आहे. वनविभागाकडून जनजागृती केली जात असताना नाशिकच्या मनसेकडून देखील फलक लावून बिबट्याबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील नाशिकरोड परिसरात अनेकदा बिबट्याचे दर्शन झालं असून एका नागरिकांवर हल्ला देखील झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र अफवांवर विश्वास ठेवू नका, लहान मुलं व वृद्धांना एकटे सोडू नका, सूचनाही फलकाद्वारे करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
Nashik : बिबट्याचे हल्ले सुरूच, पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना तरुणावर हल्ला, सिन्नरची घटना