Nashik HSC Results : पिता-पुत्रासह सुनबाई एकाच वेळी बारावी पास, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील सुखद घटना
Nashik HSC Results : नाशिक (Nashik) त्र्यंबकधील (Trimbak) देहाडे कुटुंबातील पिता पुत्रांसह सुनबाईंनी बारावीचे (hsc results) परीक्षेत यश संपादन केले आहे.
Nashik HSC Results : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते कुणीही घेतले तर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणतात. यामुळे आता अनेकजण शिक्षणावर भर देतात. आपण नाही शिकलो तर आपली मुलं शिकायला पाहिजे, अशीही धारण आता ग्रामीण भागात रुजू लागली आहे. त्यामुळे शिक्षण किती महत्वाचे आहे, हे लक्षात येत. हेच महत्व लक्षात घेऊन नाशिक (Nashik) त्र्यंबकधील देहाडे कुटुंबातील तिघेजण एकाचवेळी बारावी पास झाले आहेत. या गोष्टीची (प्रकाराची) सोशल मीडियासह तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या बारावीचा निकाल (HSC Result 2022) काल लागला. त्यानंतर बारावी पास झालेल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. अनेकजणांनी काबाड कष्ट करत, मोलमजुरी करत बारावीची परीक्षा पास केली आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातून एक सुखद धक्का देणारी घटना समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील आव्हाटे इयेथील देहाडे कुटुंबियातील तिघेजण बारावी पास झाले आहेत. याहून विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या कुटुंबातील पिता पुत्र आणि सुनबाई पास झाल्या आहेत.
लक्ष्मण देहाडे (४८) व समीर देहाडे (१९) अशी या दोघा पिता पुत्राची नावे आहेत. तर ऋतिका जाधव (20) असे सुनबाईचे नाव आहे. लक्ष्मण यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी परीक्षा दिली. तर त्यांचा मुलासह सुनबाईंनी देखील वडीलाबरोबरच बारावीचा गड सर केला आहे. यावर लक्ष्मण देहाडे म्हणाले कि, अनेकजण वयोवृद्ध असूनही परीक्षा देतात. मला बारावी झाली नसल्याची खंत बोचत होती. मुलगा आणि सुनबाई बारावीलाच होता. त्याने मला परीक्षा देण्यास प्रोत्साहीत केले.त्यानुसार मी फॉर्म भरुन परीक्षा दिली अन पासही झालो.
येथे झाली परीक्षा
त्र्यंबक तालुक्यातील आव्हाड येथील एकाच कुटुंबातील तीन विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाले आहेत त्यात सुनबाई तिचे सासरे आणि दीर यांचा समावेश आहे या तिघांनी मार्च 2022 मध्ये बारावीची परीक्षा दिली होती. बुधवारी निकाल हाती पडल्यानंतर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला लक्ष्मण देहाडे 48 ऋतिका जाधव 20 आणि समीर देहाडे एकोणवीस अशी त्यांची नावे आहेत. समीर लक्ष्मण देहाडे याला 64 टक्के गुण मिळाले असून त्याचे वडील लक्ष्मण देहाडे यांना 64.५० टक्के गुण मिळाले आहेत तर लक्ष्मण बेर्डे यांची सून कृतिका बाळू जाधव हिला 55 टक्के गुण मिळाले आहेत. यामध्ये ऋतिका स्वतः आव्हाटेयेथे, तर सासरे लक्ष्मण हे खोडाळा येथे आणि मुलगा समीर याने सामुंडी येथील कनिष्ठ महाविद्यालयतून परीक्षा दिली होती. त्यांत गरीब कुटुंब असलेल्या देहाडे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.