एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?

Sinnar Assembly Constituency : सिन्नर विधानसभा मतदारसंघात उदय सांगळे हे राष्ट्रवादी शरद गटात आज प्रवेश करणार आहेत. यामुळे अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं टेन्शन वाढणार असल्याची चर्चा आहे.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी लढत होणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. तर अनेक इच्छुक उमेदवारांकडून तिकिटासाठी फिल्डिंग लावली जात आहे. आता नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात (Sinnar Assembly Constituency) उदय सांगळे (Uday Sangle) हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात (NCP Sharad Pawar Group) आज प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group)  विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. सिन्नर विधानसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असून निवडणुकीच्या तोंडावरच उदय सांगळे शरद पवार गटात दाखल होणार आहे. 

उदय सांगळे तुतारी हाती घेणार

सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उदय सांगळे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. ते आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे हा पक्ष प्रवेश होणार असून उदय सांगळे हे सिन्नरमधून शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. उदय सांगळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून तिकीट मिळाले तर सिन्नरमध्ये उदय सांगळे विरुद्ध माणिकराव कोकाटे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिन्नर मतदारसंघाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

माणिकराव कोकाटेंसमोर तगडे आव्हान

दरम्यान, सिन्नरमधून उदय सांगळे यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरुवातीला विरोध झाल्याचे पाहायला मिळाले होते. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे उदय सांगळे यांच्याबाबत तक्रारही केली होती. मात्र आता हा वाद मिटल्याची माहिती समोर येत आहे. उदय सांगळे यांचा सिन्नरमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. ते विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करू शकतात. त्यामुळे शरद पवारांकडून उदय सांगळे यांनी तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा

शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
Maharashtra Parivartan Mahashakti : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्या एका क्लिकवर ABP MajhaVaishali Nagwade On Rahul Kul : राहुल कुल यांना जागा दिली तरी दौंडची जागा आमचीच, नागवडेंचा दावाSujay Vikhe Vs Jayashree Thorat : तर जागा दाखवू, थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंवर हल्ला,  संगमनेरमध्ये जुंपलीBJP Vidhansabha List : पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचं ग्रहण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
Maharashtra Parivartan Mahashakti : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
Embed widget