एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : 'राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच'; समीर भुजबळांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Assembly Elections 2024 : माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

नाशिक : माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या 28 तारखेला ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Constituency) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यामुळे महायुतीत बंडखोरी होणार असल्याचे दिसून येत आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

छगन भुजबळ म्हणाले की, राजकारणात असलेल्या सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे. शरद पवारांचा पुतण्या, गोपीनाथ मुंडेचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या, राजकारणातील सगळेच पुतणे यांचे डीएनए सारखाच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. छगन भुजबळांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

 ते आता मोठे झालेत : छगन भुजबळ

भुजबळ कुटुंबियांवर अनेक केसेस केल्याचे सुहास कांदे यांनी सांगितले. भुजबळ कुटुंबीयांना अनेक अडचणीतून जावे लागत आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबियांना विचार करावाच लागतो. किती दिवस ते मला विचारतील, इकडे जाऊ का? तिकडे जाऊ का? ते आता मोठे झालेत, त्यांचे निर्णय त्यांना घेवू द्या आणि त्यांनाही आता राजकारण कळतं ना, त्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याबाबत त्यांचाही अभ्यास झाला आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

समीर भुजबळांनी ठोकला नांदगाव विधानसभेसाठी शड्डू

समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देताना म्हटले आहे की, साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्द केली होती. ही जबाबदारी पार पडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभे केले. यामध्ये जिल्हाध्यक्ष पासून बुधपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली. मात्र भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगावमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहे. नांदगावमधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगावमधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal Net Worth : स्वत:च्या नावावर ट्रॅक्टर, पत्नीकडे पिकअप, 585 ग्रॅम सोनं ते शेतजमीन; छगन भुजबळांची संपत्ती किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget