एक्स्प्लोर

बिबट्याचे हल्ले सुरूच! आठ वर्षीय मुलीचा मृत्यू, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील घटना

Nashik News : बिबट्याचे हल्ले सुरूच! त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमोडी परिसरात आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लगतच्या परिसरात दहशत पसरली आहे.

Nashik News : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) धुमोडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या आठ वर्षीय मुलीवर बिबट्यांने हल्ला चढविल्याने धुमोडी परिसरात दहशत पसरली आहे.

रुचिरा एकनाथ वाघ असे मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड, देवळा, इगतपुरी, दिंडोरी आदी परिसरात बिबट्याचा वावर आहे. मात्र आता बिबट्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातही आपला मोर्चा वळविल्याचे या घटनेवरून दिसून येते.

दरम्यान आरएफओ विवेक भदाणे यांनी दिलेल्या माहिती नुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील  मौजे धुमोडी गावच्या शिवारात मळ्यात राहत असलेल्या वाघ कुटुंबिय वास्तव्यास आहे. काल सायंकाळी रुचिरा ही घरी जेवण घेऊन जात असताना तसेच घराच्या परिसरात अंधार असल्याचा फायदा घेत बिबट्याने तिच्यावर झडप घातली. तिला बिबट्याने जबड्यात धरून फरफटत नेत जंगलात पळ काढला. 

वाघ कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली. तसेच घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र आधिकारी विवेक भदाणे हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. अंजनेरी, मुळेगावसह नाशिकचे वन कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त पथकाला घटनास्थळी त्यांनी पाचारण केले. वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांनी सुमारे चार ते साडे चार तास शोध घेतला.

यावेळी स्थानिकांसह वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हातात बॅटऱ्या घेऊन सर्वत्र बलिकेचा शोध घेतला जात होता मात्र अंधार असल्याने बालिका आढळून येत नव्हती. अखेर 11 वाजता बलिकेचे शव गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडाझुडुपांमध्ये पडलेले दिसून आले. वन कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविले. 

परिसरात दहशत

सदरच्या घटनेने संपूर्ण धुमोडी पंचक्रोशीत दहशत पसरली असून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बिबट्याच्या प्रवण क्षेत्रात वनखात्याकडून रात्रीच पिंजरे तैनात करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget