एक्स्प्लोर

Bhavali Dam : भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी, नाशिक पोलिसांच्या प्रतिबंधित आदेशालाच केराची टोपली!

Bhavali Dam : भावली धरण परिसरात पर्यटक आपला जीव धोक्यात घालून धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेवर तोबा गर्दी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

नाशिक : पुण्यातील लोणावळा (lonavala) येथे पावसाळी पर्यटनादरम्यान एका कुटूंबातील पाच जणांचा पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कुठलही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पावसाळी पर्यटनाच्या (Monsoon Tourism) ठिकाणी नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) निर्बंध जारी करण्यात आले. धरण क्षेत्रातील धबधबे, भावली धरण (Bhavali Dam), गंगापूर धरण (Gangapur Dam) परिसरासह त्र्यंबक, इगतपुरी परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र नाशिकच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी समोर आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांच्या प्रतिबंधित आदेशाला पर्यटकांकडून केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.  

पावसाळी पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगाही उगारला जाणार असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिले होते. इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरातील धरण क्षेत्रामध्ये विकेण्डला पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यावर अनेक डोंगर रांगातील धबधबे कोसळू लागतात आणि ते पावसाळी पर्यटकांना आकर्षित करीत असतात. मात्र यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक पोलिसांकडून निर्बंध घालण्यात आले. 

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? 

त्यातच भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी समोर आली आहे. आपला जीव धोक्यात घालून पर्यटक धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेवर तोबा गर्दी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी भावली धरण परिसरात पर्यटकांची वर्दळ होत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या प्रतिबंधित आदेशालाच पर्यटकांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. लोणावळ्याच्या घटनेवरून पर्यटक व प्रशासन कोणतेही बोध घेताना दिसत नसल्याने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.  

पर्यटन स्थळांवर पोलिसांचे पथक तैनात करणार 

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणे, जीव धोक्यात घालून निसरड्या वाटेवर धबधब्यांवर गर्दी करणे, यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर निर्बंध लावत दुर्घटना घडू नये, यासाठी पोलिसांचे पथक पर्यटन स्थळांवर तैनात करणार असल्याचे सांगितले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Weather Forecast : मुंबईत वादळी वारा अन् अतिमुसळधार, कोल्हापूर, साताऱ्यात रेड अलर्ट; पावसाचा लेटेस्ट अंदाज काय?

Bhavali Dam : भावली धरणात डुबकी मारणं बेतलं जीवावर, नाशिकच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026: रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Embed widget