(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जवान राकेश काकुळते यांचे कर्तव्यावर असताना निधन, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nashik News : बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द येथील जवान राकेश गोकुळ काकुळते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Nashik News नाशिक : बागलाण तालुक्यातील (Baglan Talujka) किकवारी खुर्द (Kikwari Khurd) येथील जवान राकेश गोकुळ काकुळते (Rakesh Gokul Kakulte) यांचे गुजरातमधील सुरत (Surat) येथे कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज दुपारी त्यांच्यावर किकवारी खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जानेवारी 2004 मध्ये ते मराठा बटालियन तुकडी 114 मध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
राकेश काकुळते यांनी जानेवारी 2004 पासून मराठा बटालियन मध्ये भारतीय सेनेमध्ये (Indian Army) सेवेस सुरुवात केली होती. 38 वर्षीय काकुळते यांनी वीस वर्षांपासून अनेक ठिकाणी कामगिरी बजावली होती. मागील काही वर्षांपासून ते सुरत येथे आर्मी मुख्यालयात कार्यरत होते.
कर्तव्यावर असताना दुर्दैवी मृत्यू
काल शनिवारी (दि.17) दुपारी तीन वाजता कर्तव्यावर असताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आला. उपचारासाठी खाजगी रुग्णालयात (Hospital) नेले असता डॉक्टरांनी (Doctors) त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या जाण्याने किकवारी खुर्द गागासह परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांचे कुटुंबीय मृत राकेशचे पार्थिव घेण्यासाठी सुरत येथे रवाना झाले असून संपूर्ण गाव राकेशचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्याच्या राहत्या घरी थांबले आहेत.
लहानपणापासूनच देशसेवेचे आकर्षण
राकेश यांचे वडील गोकुळ नामदेव काकुळते (Gokul Namdeo Kakulte) यांनी आयुष्यभर शेतात काबाड कष्ट करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राकेशचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच राकेश यांना देशसेवेचे आकर्षण होते. राकेश यांना सैनिक क्षेत्रातील कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. राकेश यांनी स्वतःच्या जिद्द व चिकाटीवर सैनिक (Soldier) म्हणून नोकरी मिळवली होती.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
राकेश काकुळते यांचा अंत्यविधी आज (दि. 18) किकवारी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात होणार असून नाशिक आर्टिलरी सेंटर (Nashik Artillery Centre) येथील अधिकारी व सैनिक, सटाणा पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, महसूल विभागाचे तहसीलदार कैलास चावडे आदींसह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. राकेश यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या