(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Grampanchayat Election : जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या 19 जागांचा निकाल जाहीर, शिवसेना शिंदे गट आघाडीवर, पहा कुणाच्या किती जागा?
Jalgaon News : शिंदे गट आघाडीवर असून, शरद पवार गटाला 03 जागा, भाजपला तीन जागा, शिवसेना ठाकरे गटाला 02 जागा तर अजित पवार गटाला आतापर्यंत केवळ एका जागेवर यश मिळाले आहे.
जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील 167 ग्रामपंचायतींपैकी (Gramapachayat Election) 19 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवड झाली असून, यात सार्वधिक सहा जागा घेऊन शिवसेना (Shivsena) शिंदे गट आघाडीवर पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाला 03 जागा, भाजपला तीन जागा, शिवसेना ठाकरे गटाला 02 जागा तर अजित पवार गटाला आतापर्यंत केवळ एका जागेवर यश मिळाले आहे. अजूनही निकाल येत असून त्यानंतर नेमक्या कुणाला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) 1159 ग्रामपंचायतीपैकी 167 ग्राम पंचायतीसाठीची निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली असून, आज मतमोजणीला सुरवात झाली आहे. तत्पूर्वी 16 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या असल्याने 151 ग्रामपंचायतीसाठी मतदान (Voting) झाले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), मंत्री अनिल पाटील आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली असून, यात 19 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाची बिनविरोध निवड झाली आहे. या 19 जागांमध्ये सहा जागा घेऊन शिवसेना शिंदे गटाने आपला दबदबा निर्माण केला आहे. यात शिंदे गटाला सहा जागा, शरद पवार (Sharad Pawar) गटाला 03 जागा, भाजपाला 03 जागा, अजित पवार गट 01 जागा, शिवसेना ठाकरे गट 02 जागा, सर्वपक्षीय 03 जागा, 01 अपक्ष असा आतापर्यंतचा निकाल आहे.
दरम्यान, भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील पासर्डी ग्रामपंचायतीसह लोणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सरपंच निवडला आहे. जळगाव तालुक्यातील पळसोदसह जामोद आणि खेडी खुर्द या ग्रामपंचायतीला शिवसेना शिंदे गटाचा सरपंच निवडला गेला आहे. धरणगाव तालुक्यातील भोदु खुर्द, तरडे खुर्द ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गट, चांदसर बुद्रुक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी अजित पवार गट, वराड खुर्द ग्रामपंचायतीवर अपक्ष, तर डॉ हेडगेवार नगर येथे भाजपचा सरपंच झाला आहे. जामनेर तालुक्यातील गारखेडा ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता काबीज केली आहे. चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक - शिवसेना शिंदे गट, धुपे बुद्रुक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता आली आहे. पारोळा तालुक्यातील खोलसर कामतवाडी, दगडी सबगव्हाण या दोन्ही ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा ग्रामपंचायतीवर भाजप सरपंच निवड झाली आहे. यावल तालुक्यातील गिरडगाव ग्रामपंचायतीवर सर्वपक्षीय सरपंच निवडला आहे. त्याचबरोबर अमळनेर तालुक्यातील दोधवदसह पिंपळे खुर्द ग्रामपंचायतीवर सर्वपक्षीय सत्ता आली आहे.
जळगाव जिल्ह्यात 167 ग्रामपंचायतीचा निकाल
जळगाव जिल्ह्यात 1159 ग्रामपंचायतीपैकी 167 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यापैकी 16 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या असल्याने 151 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. या निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरवात झाली असून, सुरवातीच्या 19 जागांपैकी 6 जागांवर शिवसेना शिंदे गटाने सत्ता स्थापन केली आहे.
इतर महत्वाची बातमी :