एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींना काळाराम मंदिर देवस्थानचे निमंत्रण, अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याआधी दर्शन घेण्याची विनंती

12 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा नाशिकमधे येणार आहेत त्या दिवशी त्यांनी काळारामचे दर्शन घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

अयोध्या : अयोद्धेतील (Ayodhya)  राम मंदिर (Ram Mandir)  लोकार्पण सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  नाशिक दौऱ्यावर (Nashik News)  येणार आहेत. नाशिक दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  अतिप्राचीन काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी निंमत्रण देण्यत आले आहे. नाशिक दौऱ्याचे औचित्य साधून या काळात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे.  काळाराम देवस्थानाचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी ही माहिती दिली आहे. 

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य असल्याचे सांगतात. त्यामुळे श्रीरामांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. याबाबतची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे श्री काळाराम मंदिर प्रमुख मंदिर मानले जाते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर जेथे त्यांनी वास केला होता. त्यामुळे या मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अयोध्येतील राम मंदीर लोकार्पण सोहळ्या आधी मोदींनी अतिप्राचीन काळारामचे दर्शन घेण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या आधी मोदी नाशिक दौऱ्यावर आलेत मात्र काळारामचे दर्शन न घेताच माघारी फिरले. त्यामुळे 12 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा नाशिकमधे येणार आहेत त्या दिवशी त्यांनी काळारामचे दर्शन घेण्याची विनंती करण्यात आली आहे.  

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही फोडणार

12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येण्याची शक्यता आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक मेळावाचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही फोडणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या महोत्सवाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देण्यात आली आहे.  मोदींच्या दौऱ्या निमित्ताने प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे. राष्ट्रीय युवक मेळावासाठी जागेचा शोध सुरू आहे. या युवक मेळाव्यासाठी राज्यभरातून अनेक युवक येण्याची शक्यता आहे. 

काय आहे मंदिराची आख्यायिका?

साधारण काही वर्षांपूर्वी या परिसरात नागपंथीय साधू वास्तव्यास होते. मंदिरालगत भैरवनाथ व गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या. त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे 1780 मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. 1790 मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी 23 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगतात. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Nashik News: मालेगावातील बंधाऱ्यावर रात्री हायव्होल्टेज ड्रामा, तरुणाचा टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न; आपत्ती व्यवस्थापनासह पोलिसांची धावपळ, मीडियाच्या टीमने संवाद साधला अन्...
मालेगावातील बंधाऱ्यावर रात्री हायव्होल्टेज ड्रामा, तरुणाचा टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न; आपत्ती व्यवस्थापनासह पोलिसांची धावपळ, मीडियाच्या टीमने संवाद साधला अन्...
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Sub Classification Maharashtra: महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Embed widget