एक्स्प्लोर

Hemant Godse : उमेदवारी जाहीर होताच हेमंत गोडसेंचं नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन, शांतीगिरी महाराजांबाबत केलं मोठं वक्तव्य

Nashik Lok Sabha Constituency : हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच हेमंत गोडसेंकडून नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

Nashik Lok Sabha Constituency : गेल्या महिन्याभरापासून महायुतीत (Mahayuti) नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र काल (दि. 01) नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला. नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. हेमंत गोडसे हे सलग तिसऱ्यांदा नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

आज नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction) उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis)  आणि राष्ट्रवादी अजित गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित राहणार आहेत. नाशिकमध्ये महायुतीकडून आज जोरदार शक्तीप्रदर्शन होत आहे. तसेच जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.  

हेमंत गोडसेंचे नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीपासून नाशिक शहराकडे वाहनांची 'महाविजय रॅली' काढण्यात आली आहे. या रॅलीला शिवसैनिक आणि गोडसे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.  नाशिकच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीने  दावा केला होता. मात्र नाशिकची जागा आपल्याकडेच ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आले आहे.  आता  2014, 2019 नंतर सलग तिसऱ्यांदा हेमंत गोडसे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शांतीगिरी महाराजांना थांबण्याची आम्ही विनंती करणार असल्याचे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.

नाशिकची निवडणूक ठरणार लक्षवेधी 

दरम्यान, महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांची प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण झाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर (Karan Gaikar) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नाशिकची निवडणूक राज्यभरात लक्षवेधी ठरणार आहे. आता नाशिकमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

दिंडोरीत भाजपचं टेन्शन वाढणार, भारती पवार उमेदवारी अर्ज भरणार असतानाच हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरीच्या तयारीत

Nashik Lok Sabha : अखेर नाशिकचा तिढा सुटला! गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होताच भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.... 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik Land Scam : शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
Chandrashekhar Bawankule: नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची-त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget