एक्स्प्लोर

Governor Ramesh Bais in Nashik : राज्यपाल रमेश बैस नाशिक दौऱ्यावर; प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन

Governor Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते काळाराम मंदिरात आरती व पूजाविधी करण्यात आला. यावेळी नाशिक शहर पोलिसांकडून चोख पोलीस बंदाबस्ताचे नियोजन करण्यात आले.

Governor Ramesh Bais नाशिक : राज्यपाल रमेश बैस हे आज शुक्रवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले आहेत. नुकतेच त्यांचे पोलीस कवायत मैदानावर आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांसोबत क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) देखील उपस्थित आहे. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांकडून (Nashik Police) चोख पोलीस बंदाबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्यपालांच्या हस्ते काळाराम मंदिरात पूजाविधी

पोलीस कवायत मैदानावरून राज्यपाल नाशिकच्या पंचवटी येथील काळाराम मंदिरात (kalaram Mandir) दाखल झाले. यावेळी काळाराम मंदिर परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. राज्यपाल बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरात आरती व पूजाविधी करण्यात आली. 

याप्रसंगी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपलिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी आदी उपस्थित होते. काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर राज्यपाल रमेश बैस हे मोटारीने त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाऊंडेशन येथे नियोजित कार्यक्रमासाठी मार्गस्त झाले.

राज्यपाल मंदिरात दाखल होताच संपूर्ण परिसर मोकळा

राज्यपाल रमेश बैस हे काळाराम मंदिराच्या परिसरात दाखल होताच परिसरात संपूर्णपणे मोकळा करण्यात आला होता. राज्यपाल मंदिर परिसरातून बाहेर जात नाही तोपर्यंत काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना मंदिर परिसरात जाण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे भाविकांना तात्कळत राहावे लागले. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४५० पोलिसांचा ताफा शहरात तैनात करण्यात आला. काळाराम मंदिर परिसरात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सुमारे १५० जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय शीघ्रकृती दलासह राखीव तुकडीही सज्ज ठेवण्यात आली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, तीन पोलीस निरीक्षक, 25 सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक,  450 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला. 

इतर महत्वाच्या बातम्या

Nashik Weather Update : नाशिकसह 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Nashik Bus Accident : स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस आदळली झाडावर; चालक-वाहकासह 17 प्रवासी जखमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget